Entertainment News Live Updates 14 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jul 2022 04:56 PM
पंजाबी गायक दलेर मेहंदीला दिलासा नाही; मानव तस्करी प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कायम

पंजाबी गायक दलेर मेहंदी हा सध्या कारावासात आहे . पटियाला कोर्टानं मानव तस्करी प्रकरणी दलेर मेहंदीला दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण 2003 मधील आहे, 15 वर्षानंतर या प्रकणावर सुनावणी करण्यात आली आहे. 

Darling : प्रथमेश-रितीकाच्या 'डार्लिंग'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; प्रेक्षकांसाठी मेजवानी

Darling Movie : 'डार्लिंग' (Darling) हा सिनेमा 10 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित असून आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. 





Neetu Chandra : 'पैसे नव्हते, काम नव्हतं, उद्योजकानं पत्नी होण्यासाठी दिली 25 लाखांची ऑफर'; अभिनेत्री नीतू चंद्रानं सांगितला अनुभव

Neetu Chandra : अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये नीतू चंद्रानं तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिनं सांगितलं की, एका बिझनेस मॅननं तिला सॅलरीड वाइफ होण्याची ऑफर दिली होती. पत्नी होण्यासाठी नीतूला त्या बिझनेस मॅननं 25 लाख दर महिन्याला मानधन देण्याची ऑफर दिली होती. तसेच नीतूनं एका ऑडिशन दरम्यान घडलेला किस्सा देखील सांगितला. 

आई कुठे काय करते मालिकेच्या पडद्यामागची धमाल

अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी शेअर केला छायाचित्रकार राजू देसाई यांचा खास व्हिडिओ. सीन अधिकाधिक खुलावा आणि वास्तववादी दिसावा याकरता कलाकारांसोबत दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळीही झटत असतात. राजू देसाई यांनी एक सीन चक्क टेम्पोवर चढून शूट केला. राजू यांच्या या अनोख्या प्रयत्नाचं मिलिंद गवळी यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

सोनालीनं दिली रुग्णालयाला भेट, आठवणींना उजाळा

Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा (Sonali Bendre) चाहता वर्ग मोठा आहे. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं. सोनालीला 2018 मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचे  (Metastatic Cancer) निदान झाले होते, त्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले होते, आता सोनाली कॅन्सरमुक्त झाली आहे. आता चार वर्षानंतर सोनालीनं त्याच हॉस्पिटला भेट दिली, ज्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कॅन्सरचे उपचार करण्यात आले. हॉस्पिटमधील एक व्हिडीओ सोनालीनं शेअर केला आहे.


पाहा व्हिडीओ



जन्हनी कपूरच्या गुड लक जेरीचा ट्रेलर रिलीज

पाहा ट्रेलर:


'Emergency'चा टीझर रिलीज; कंगना रनौतनं साकारली इंदिरा गांधींची भूमिका

Emergency Teaser : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कंगना तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहतात. लवकरच कंगनाचा इमरजंसी (Emergency) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे. 


पाहा टीझर:



ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जीनं अस्त्रांबाबत दिली माहिती

Brahmastra : लवकरच ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), मौनी रॉय (Mouni Roy), नागार्जुन (Nagarjun), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) केलं आहे. हा चित्रपट तीन पार्ट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपट निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अयान मुखर्जीनं अस्त्रांची माहिती दिली आहे. 


पाहा व्हिडीओ 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप


'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या नव-नवे ट्विस्ट येत आहेत. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी कानविंदे कुटुंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. आता या मालिकेतून सोनटक्के सर एक्झिट घेत आहेत.


गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!


अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न


शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच डॅडी कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताराम नांदगावकर फाउंडेशनतर्फे मिरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या सोहळा पार पडला.


कॉफी विथ करणमध्ये साराचा गौप्यस्फोट


बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे.  आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जाह्नवी कपूर या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.