Entertainment News Live Updates 10 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Mar 2023 04:18 PM
Urmi : मल्टिस्टारर 'उर्मी' सिनेमाचा टीझर आऊट

Urmi Marathi Movie : 'उर्मी' (Urmi) या मल्टिस्टारर सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

Bheed : राजकुमार रावच्या 'भीड'चा ट्रेलर आऊट!

Rajkummar Rao Bhumi Pednekar Bheed Trailer Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumaar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) आगामी 'भीड' (Bheed) या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.





Sharad Pawar : कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होतंय : शरद पवार

कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होतंय : शरद पवार


Sharad Pawar : क्विंटल मागे कांद्याला किमान 1200 दर मिळावा : शरद पवार

क्विंटल मागे कांद्याला किमान 1200 दर मिळावा : शरद पवार


Sharad Pawar : शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं : शरद पवार

शेतकऱ्यांना जात विचारणं चुकीचं : शरद पवार



 

Kanyadan : ‘कन्यादान’ मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत

Kanyadan Serial Nirmiti Sawant Entry : 'कन्यादान' (Kanyadan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं असून मालिकेत आता निर्मिती सावंतची (Nirmiti Sawant) एन्ट्री होणार आहे. 'कन्यादान' या मालिकेत निर्मिती आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 





Khatron Ke Khiladi 13 : उर्फीने नाकारला रोहित शेट्टीचा शो

Urfi Javed On Khatron Ke Khiladi : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron ke Khiladi 13) हा छोट्या पडद्यावरील साहसी कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वात उर्फी जावेद (Urfi Javed) सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार,'खतरों के खिलाडी 13'मध्ये उर्फी जावेद सहभागी होणार नाही. 





Deepika Padukone: दीपिका निघाली ऑस्करला, विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'अभिमानास्पद...'

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही ऑस्कर-2023 (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रेजेंट करणार आहे. दीपिका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून अमेरिकेला गेली आहे. दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दीपिका ही एअरपोर्टवरील गेटवर जाण्यापूर्वी फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. 





Bharti Singh Haarsh Limbachiyaa : भारती आणि हर्षने दिली गुडन्यूज

Bharti Singh Haarsh Limbachiyaa Cameo In Rocky Aur Rani Ki Prem Kahani : विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) सध्या चर्चेत आहेत. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Satish Kaushik Net Worth : सतीश कौशिक यांनी पत्नी आणि मुलीसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती

Satish Kaushik : प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' (Mister India) या सिनेमातील 'कॅलेंडर' या भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. अभिनेते, पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांनी आपल्या मागे कोट्यवधींची संपत्ती सोडली आहे. 

TJMM OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर होणार रिलीज

Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 





Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांच्या मुलीने शेअर केली पोस्ट; फोटो पाहून नेटकरी भावूक

Satish Kaushik Death: बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक  सतीश कौशिक (Satish Kaushik) निधन झाले. मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आता सतीश यांची 10 वर्षांची मुलगी वंशिका कौशिक हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी भावूक झाले. 



Aai Kuthe Kay Karte: 'या वयात लग्न करावं का...?'; आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.  या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे आणि कथानकामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्नगाठ बांधली आहे. अरुंधती आणि आशुतोष  यांनी लग्न केल्यानं आता काही प्रेक्षक या मालिकेला ट्रोल करत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट



Sonalee Kulkarni On International Womens Day : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे. 


Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार



Drishyam 3 : 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमावर काम करत आहे. 


Satish Kaushik Passes Away: 'मेरे पप्पू पेजर नहीं रहे', गोविंदाने वाहिली सतिश कौशिक यांना श्रद्धांजली


Satish Kaushik Passes Away: सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सगळ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींचे डोळे पाणावले असून कोणाचा विश्वास बसत नाही की सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेक चित्रपटांमध्ये सतीश कौशिकचा सहकलाकार असलेल्या गोविंदाने अभिनेत्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने खूप दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले.


Maharashtra Budget 2023 : मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी बजेटमध्ये काय? जाणून घ्या एका क्लिकवर








 






 Maharashtra Budget 2023 :  राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ , विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे करण्याची घोषणा केली.






 






 

























- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.