Entertainment News Live Updates 1 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 01 Dec 2022 05:23 PM
Singham Again: 'सिंघम अगेन'; अजय आणि रोहितच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला सिंघम या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याच्या 'बाजीराव सिंघम' या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यानं केलं. सिंघम, सिंघम रिटर्स असे सिंघम चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता या चित्रपटाचा प्रीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव सिंघम अगेन (Singham Again) असं असणार आहे. 





Govinda Naam Mera:  गोविंदा नाम मेरा चित्रपटातील बना शराबी गाणं रिलीज

Govinda Naam Mera:  विका कौशलचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातील बना शराबी हे गाणं रिलीज झालं आहे. 


पाहा गाणं: 


Sam Bahadur: 'सॅम बहादुर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; विकीनं शेअर केली पोस्ट

Sam Bahadur: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या(Vicky Kaushal) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता विकीच्या आणखी एका आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विकीनं त्याच्या सॅम बहादुर (Sam Bahadur)  या चित्रपटाचा टीझर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 



Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उज्जैनमध्ये; अभिनेत्री स्वरा भास्कर झाली सहभागी

Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे  (Congress) नेते  राहुल गांधीयांची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा ही मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) येथे पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेला 83 दिवस पूर्ण झाले आहेत.  भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही देखील आज (1 डिसेंबर) भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली आहे. काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन स्वराचा भारज जोडो यात्रेतील फोटो शेअर करण्यात आला आहे. 



Raavrambha: ‘रावरंभा’ चित्रपटात अशोक समर्थ साकारणार सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका

Raavrambha: मराठी सिनेमांमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीला सध्या चांगले दिवस आहेत.  महाराष्ट्रा बरोबरच अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट ही तर तमाम आबालवृद्धांना पर्वणीच असते. सहकुटुंब पहावे असे हे चित्रपट असतात. अशातच ‘रावरंभा’ (Raavrambha) हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे? कोण कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात असताना, स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लक्षवेधी झलक समोर आली आहे. स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.  



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना आता दुप्पट अनुदान  


Mumbai News:  गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.  सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली  चित्रपट उद्योगातील चित्रपट, टिव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट  अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि या चित्रपट  निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.


Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात 'गोल्डन बॉईज'ची दमदार एन्ट्री


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस 16 हा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल शो पैकी एक आहे. आजकाल हा शो सर्वांचा आवडता झाला आहे. या शो ला अधिक रंजक बनविण्यासाठी, बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. आणि हे वाईल्ड कार्ड स्पर्धक दुसरे कोणी नसून गोल्डन बॉईज म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर आहेत.


ED Questioned Vijay Deverakonda: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; लायगर चित्रपटाच्या फंडींगबाबत 9 तास चौकशी


ED Questioned Vijay Deverakonda: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा


(Actor Vijay Deverakonda) याची ईडीकडून (ED) तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. लायगर (Liger Movie)  सिनेमाच्या फंडिंग प्रकरणी हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाची चौकशी करण्यात आली. ईडीने बुधवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता विजय देवरकोंडा याची 'लायगर' चित्रपटाच्या फंडिग प्रकरणी चौकशी केली. हैदराबाद (Hyderabad) येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात अभिनेत्याची सुमारे 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर यासंदर्भात विजय देवराकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, लोकप्रियता मिळाल्यानंतर काही समस्या आणि दुष्परिणामही भोगावे लागतात. हा एक अनुभव आहे, हे जीवन आहे. मला बोलावल्यावर मी माझं कर्तव्य निभावलं, मी येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली."

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.