Entertainment News Live Updates 05 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Apr 2023 02:32 PM
Bholaa Box Office Collection : अजयच्या 'भोला'ची छप्परफाड कमाई सुरूच

Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 30 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.





Ricky Pond: 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकला रिकी पाँड; नेटकरी म्हणाले, 'रिकी तात्या...'

Ricky Pond: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा  शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटी सोशल महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावर रिल्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्यावर आता सोशल मीडिया स्टार रिकी पाँड (Ricky Pond) देखील थिरकला आहे. 



Khatron Ke Khiladi 13 : सेलिब्रिटी करणार खतरनाक स्टंट, रोहित शेट्टी घेणार स्पर्धकांची शाळा; 'खतरों के खिलाडी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Rohit Shetty Khatron Ke Khiladi 13 : सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या साहसी खेळात अनेक सेलिब्रिटी खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.





Pravin Tarde : 'बलोच'मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंच्या नजरेत धगधगणारी आग; अंगावर शहारे आणणारं मोशन पोस्टर आऊट

Pravin Tarde Marathi Movie Baloch : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या 'बलोच' (Baloch) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. 





Hrithik Roshan : 'War 2'मध्ये 'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआरची एन्ट्री!

Junior NTR In Hrithik Roshan War 2 : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या 'वॉर 2' (War 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनचा 'वॉर' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या दुसऱ्या भागात 'आरआरआर' (RRR) फेम ज्युनियर एनटीआर (Junior NTR) झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 

Kiccha Sudeep : भाजपप्रवेशाच्या चर्चेदरम्यान किच्ची सुदीपला मिळालं धमकीचं पत्र

Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचं धमकीचं पत्र मिळालं आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. 



Sonu Sood: वडिलांच्या पावलावर पाऊल, गरजू लोकांच्या मदतीला धावला सोनू सूदचा मुलगा; व्हिडीओ व्हायरल

Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेक गरजू लोकांची सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदत देखील सोनूनं केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता सोनू सूदच्या पावलावर पाऊल टाकून त्याचा मुलगा देखील गरजू लोकांची मदत करत आहे. 



Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणावर आज सुनावणी; जॅकलिन कोर्टात हजर

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या  सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आज (5 एप्रिल) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) हजर झाली आहे. या प्रकरणात जॅकलिनही आरोपी असून, ईडीने तिची अनेकदा चौकशीही केली आहे.



Nagraj Manjule : 'झुंड','घर बंदूक बिरयानी' नंतर नागराज मंजुळे झळकणार 'या' सिनेमात

Nagraj Manjule New Marathi Movie : आशेच्या भांगेची नशा भारी असलेला नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराजच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत नागराज यांनी त्यांच्या आगामी सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे.

Happy Birthday Rashmika Mandanna : नॅशनल क्रश ते पुष्पाची श्रीवल्ली; कोट्यवधींची मालकीण असलेली रश्मिका मंदान्ना एका सिनेमासाठी किती मानधन घेते?

Rashmika Mandanna Birthday : 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणून लोकप्रिय असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) आज वाढदिवस आहे. रश्मिकाने सौंदर्यासह अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही रश्मिकाची क्रेझ आहे. 


Happy Birthday Rashmika Mandanna : नॅशनल क्रश ते पुष्पाची श्रीवल्ली; कोट्यवधींची मालकीण असलेली रश्मिका मंदान्ना एका सिनेमासाठी किती मानधन घेते?

Adipurush : 'आदिपुरुष'च्या अडचणीत पुन्हा वाढ; रामाचं जानवं, सीताच्या भांगेत कुंकू नसल्याने दिग्दर्शकांसह कलाकारांवर तक्रार दाखल

Adipurush New Poster Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतचं या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं असून आता या पोस्टवरुन नवा वाद सुरू झाला आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे या पोस्टवरुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याने ओम राऊतसह (Om Raut) कलाकारांवर संजय तिवारी यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


RRR Film: जपानच्या बॉक्स ऑफिसवरही आरआरआरचा जलवा; केला 'हा' रेकॉर्ड


RRR In Japan: 'आरआरआर' (RRR) या चित्रपटानं भरातातच नाही तर जगभरात विशेष लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं ऑस्कर पटकावला. आता आरआरआर या चित्रपटानं जपान (Japan) देशातील चित्रपटगृहाच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट  जपानमधील 44 शहरे आणि प्रांतांमध्ये 209 स्क्रीन्स आणि 31 IMAX स्क्रीनवर रिलीज झालेला. आरआरआर हा चित्रपट जपानमध्ये 1 मिलियनेक्षा जास्त फुटफॉल करणारा  पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.


Yentamma Song Out : सलमानचा लुंगी अवतार; राम चरण आणि वेंकटेश दग्गुबातीसोबत थिरकला 'Yentamma' गाण्यावर


Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Yentamma Song Out : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. आता या सिनेमातील 'येंतम्मा' (Yentamma Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील सलमानचा दाक्षिणात्य लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'येंतम्मा' या गाण्यात सलमान खान आणि वेंकटेश दग्गुबाती, राम चरणसह, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव गुयाल, जस्सी गील आणि पलक तिवारीची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्यात सलमान खानने लुंगी नेसलेली असून तो गॉगल लाऊन डान्स करताना दिसत आहे. सलमान आणि राम चरण, वेंकटेशचा हटके स्वॅग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 


Extraction 2 चा जबरदस्त टीझर रिलीज; ख्रिस हेमन्सवर्थ अॅक्शन मोडमध्ये


Extraction 2 Teaser: नेटफ्लिक्सवर (Netflix) विविध हॉलिवूड फिल्म्स रिलीज होत असतात. लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी (Ott) प्लॅटफॉर्मवर एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) हा चित्रपट रिलीज होणार आहे.  एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) या हॉलिवूड (Hollywood Movie) फिल्मची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिला भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. एक्स्ट्रॅक्शन 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा  जबरदस्त टीझर नुकताच रिलीज केला आहे. सध्या या टीझरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या टीझरमध्ये अभिनेता ख्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemnsworth) हटके अंदाज पहायला मिळत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.