Mohiammad shami: नुकताच घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohiammad shami) अलिकडेच त्याची मुलगी आयरासोबत खरेदीसाठी गेलेला दिसला. शमीनं इन्स्टागॅम अकाऊंटवरून आपल्या मुलीसोबत घालवलेल्या एका दिवसाच्या मजेबद्दलचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावर बऱ्याच दिवसांनी मी तिला पाहिलं तेंव्हा थोड्यावेळ थबकला. या शब्दांपेक्षा तु‌झ्यावर अधिक प्रेम आहे. अशी पोस्ट केली आहे. यावर त्याच्या पूर्वपत्नीनं हा सगळा शोऑफ असल्याचा आरोप त्याच्यावर केलाय. तिची ही प्रतिक्रीया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


मोहम्मद शमीचे नुकतेच त्याची मुलगी आयरासोबत हृदयस्पर्शी पुनर्मिलन झाले. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार प्रदीर्घ काळाच्या विभक्ती झाल्यानंतर शेवटी आपल्या मुलीसोबत दर्जेदार वेळ घालवू शकला आणि वडील-मुलगी दोघे एकत्र शॉपिंग ट्रिपचा आनंद लुटताना दिसले.


हा केवळ दिखावा करण्यासाठी...


शमीची पूर्व पत्नी हसीन जहाँ मात्र, भारताच्या वेगवान गोलंदाजानं  मुलीबाबत केलेला हा आव असून हे केवळ दिखावा करण्यासाठी असल्याचं म्हटलंय. माझ्या मुलीच्या पासपोर्टची मुदत आता संपली हे. नवीन पासपोर्टसाठी शमची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळेच ती वडिलांना भेटायला गेली होती पण शमीनं सही केली नसल्याचं हसीन जहाँनं सांगितलंय. तो मुलीसोबत केवळ शॉपिंग मॉलमध्ये गेला  होता.


 






माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता


ज्या कंपनीसाठी शमी जाहिरात करतो, तो तिला तिथे घेऊन गेला होता. माझ्या मुलीने त्या दुकानातून बूट आणि कपडे घेतले. तिथून काहीही खरेदी करण्यासाठी शमीला पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे तिल तिथे नेण्यात आलं. माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता. त्याने ती वस्तू खरेदी केली नाही.  हसीनानं एका वेबसाईटला प्रतिक्रीया ही दिली आहे.


क्रिकेटच्या मैदानावर शमीनं सर्व फॉरमॅटमध्ये यशस्वी भारतीय क्रिकेटर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्याच्या पूर्वपत्नीची प्रतिक्रीया समोर आल्यांतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तणावपूर्ण संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही हसीन जहाँनं मॅच फिक्सिंगचाआरोप केला होता. त्यामुळेच बीसीसीआय लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने त्याबाबत चौकशीही केली हाोती. त्यानंतर आता मुलीचा व्हिडिओ शमीनं शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या पत्नीची रिॲक्शन चर्चेचा विषय ठरली आहे.


घोट्याच्या इंज्यूरीतून सावरतोय शमी


उत्तर प्रदेशात जन्मलेला हा क्रिकेटपटू भारताकडून शेवटचा खेळला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ज्यामध्ये भारताचा सहा विकेट्सने पराभव झाला. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर पडला होता आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.