Housefull 5: अक्षय कुमार अजय देवगन आणि शाहरुख खान सोबत पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकणारी अभिनेत्री आता हाउसफुल 5 या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या 16 पर्वातही ही अभिनेत्री झळकली होती. नुकत्याच एका मुलाखतीत सौंदर्या शर्माने हाउसफुल 5 सिनेमाच्या गमतीजमती शेअर केल्या. हाउसफुलसारख्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने ती उत्साही असल्याचं तिने सांगितलं. हाउसफुलच्या सेटवर सर्वाधिक ट्रोलिंग माझीच होत असल्याचं सांगत सेटवर सर्वात मजेदार कोण वागतं याविषयीही ती बोलली आहे. 


अक्षय सर्वात मस्तीखोर, मी सर्वाधिक troll झाले


रितेश सर खूप नम्र आणि गोड आहेत. बिग बॉस मध्ये असल्यापासून मी त्यांना ओळखते बिग बॉसच्या सेटवर जेनेलिया आणि रितेश सर दोघेही आले होते. जॅकलीन स्वीट हार्ट आहे. अभिषेक सरही खूप नम्र असल्याचं तिने सांगितलं.  अक्षय सर सर्वात मस्तीखोर असल्याचं सौंदर्याने सांगितले. मी जुनियर असल्याने सगळेजण मला ट्रोल करायचे. सेटवर मजा यायची. कोणाचातरी फोनवरून हळूच मेसेज आला की नंतर कळायचं की अक्षय सरांनी तो केला होता. या चित्रपटात माझी भूमिका म्हणजे सरप्राईज पॅकेज आहे.


चित्रपटाची ऑफर आल्यावर रडले 


बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एवढी मोठी ऑफर कोणालाही मिळाली नसेल. जेव्हा हाउसफुल पाचची ऑफर देण्यात आली तेव्हा मी रडत होते. थरथर कापत होते. त्यांनी मला घरी येऊन करारावर सही करण्यास सांगितले तेव्हा मी माझे स्वाक्षरीही विसरले होते असं तिने सांगितलं. 


मला वाटलं होतं बिगबॉसमध्ये मी टिकणार नाही


बिग बॉसमध्ये मी गेले खरी पण मला आतून असं वाटत होतं की कशी भांडणार या लोकांशी. मी आतापर्यंत केलेल्या भूमिका अतिशय निवडून केल्या आहेत. काही हिट चित्रपटांच्या ऑफर नाकारून बिग बॉसमध्ये वर्णी लागली. मला वाटलं होतं दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात मी वापस येईन. पण देवाची कृपा होती. त्यामुळे या स्पर्धेत टिकले. नंतर बाहेर पडल्यानंतर अक्षय सर शाहरुख सरांसोबत असणाऱ्या ॲडची ऑफर आली. असं सौंदर्या म्हणाली.


हाऊसफुल 5 मध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री


प्रोड्युसर साजिद नाडीयाडवालाने हाऊसफुल 5 चित्रपटात नवीन अभिनेत्याची एन्ट्री झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. साजिद नाडीयाडवालाने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात अपडेट दिली आहे. साजिदने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर करत अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची या चित्रपटात एन्ट्री झाल्याचं सांगितलं आहे.  


हेही वाचा:


Housefull 5 : अक्षय कुमारसोबत आणखी एक सुपरस्टार लावणार कॉमेडीचा तडका, हाऊसफुल 5 मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री