Astrology Panchang 26 October 2024 : आज शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे आणि मंगळ चंद्रापासून बाराव्या भावात असेल, त्यामुळे अनफा योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी शुक्ल योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या इच्छा आज सहज पूर्ण होतील. घरातील मोठ्यांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता किंवा कौटुंबिक मालमत्तेतून लाभ मिळवू शकता. जर तुम्ही कोणत्याही संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून कर्जासाठी अर्ज केला असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या संबंधांमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि संध्याकाळी मुलांसोबत खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल.


कर्क रास (Cancer)


आज कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल असणार आहे. कर्क राशीचे लोक आज त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घडत असल्याचं पाहतील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आराम मिळेल. आज नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य पार्टीच्या मूडमध्ये दिसतील आणि आनंदीही होतील. आज व्यवसायाला दीर्घकाळ पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, तर त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. नोकरी करणारे आज आपलं काम आनंदाने पूर्ण करतील. तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.


सिंह रास (Leo)


आज सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. सिंह राशीच्या लोकांवर आज शनिदेवाची कृपा असेल आणि तुम्हाला कुटुंब, पैसा, करिअर इत्यादींशी संबंधित समस्यांपासून हळूहळू आराम मिळेल. तुमच्या मुलांचं भविष्य लक्षात घेऊन तुम्ही आज काही मालमत्ता खरेदी करू शकता. जर तुम्हाला तुमचं दुकान किंवा व्यवसाय वाढवायचा असेल तर आज तुम्हाला यश मिळू शकतं आणि पैसे कमवण्यासाठी नवीन योजनांवर देखील काम कराल. समाजातील तुमच्या वागणुकीमुळे आणि उदारतेमुळे सर्वजण तुमच्यावर प्रभावित होतील आणि सोशल मीडियावर तुमच्या फॉलोअर्सची संख्याही वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत असलेले सर्व गैरसमज दूर होतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. तुम्हाला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास, आज तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. आज तुम्ही फोन, वाहन, टीव्ही इत्यादी वस्तू खरेदी करू शकता आणि कुटुंबात दिवाळीच्या तयारीवर भर असेल. कर्मचाऱ्यांचं काम पाहून अधिकारी त्यांचं खूप कौतुक करतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळेल आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातंही घट्ट होईल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज शनिदेवाच्या कृपेने खूप आत्मविश्वासाने भरलेले दिसतील. तुमचे खर्चही कमी होऊ लागतील आणि बचत आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्यावर भर असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातील सदस्यांनाही सरकारी योजनेचा चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज मित्राकडून चांगली बातमी मिळेल. सायंकाळी पालकांसह देव दर्शनाचा लाभ घ्याल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 26 October 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य