Bigboss18: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी गुणरत्न सदावर्ते कायमच चर्चेत असतात. सुप्रीम कोर्टात आरक्षणाचा खटला चालवणारे सदावर्ते आता बिग बॉसमध्ये स्पर्धक आहेत. यात दाऊदच्या धमकीच्या फोनपासून ते जेलमध्ये भेटलेल्या डॉक्टरपर्यंतचे अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले आहेत. त्यांच्या विधानांनी खळबळ उडाली असून जेलमध्ये अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि तिथे कसाब होता. त्यावेळी जेल मधला एका अधिकाऱ्यांनी खंडाळा घाटात सदावर्त्यांच्या एन्काऊंटरविषयी सांगितल्याचाही खुलासा त्यांनी केल्यामुळे प्रेक्षकांसहित सर्वांनाच धक्का बसला आहे.
बिग बॉसच्या घरात आल्यापासून गुणरत्न सदावर्ते यांनी घरात आपली पकड मजबूत बनवल्याचं दिसतंय. चेष्टा मस्करी आणि वादग्रस्त वक्तव्य करत पहिला तीन दिवसातच बिग बॉस आणि कलर्सनाही सदावर्त्यांचे प्रोमो त्यांच्या अधिकृत पेज वरून शेअर केले होते. आता बिग बॉसच्या घरात त्यांनी केलेली खळबळजनक विधानांनी राजकीय वातावरण तापण्याची ही दाट शक्यता आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रेक्षकांचं लक्ष वळवून घेतलाच दिसत आहे. महाविकास आघाडीच्या काळात आपला खंडाळ्याच्या घाटात एन्काऊंटर केला जाणार होता असा धक्कादायक खुलासात त्यांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर शरद पवारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर सदावर्त यांना अटक झाली. त्यावेळी पोलिसांबरोबर गेलो असतो तर खंडाळा घाटात पोलिसांना माझा एन्काऊंटर करायचा होता असा आरोपही त्यांनी केलाय.
बिग बॉसच्या घरात येण्याआधी दाऊदच्या धमकीचे फोन!
बिग बॉसच्या घरात येण्याआधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. ते दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचेच असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. हे धमकीचे फोन कराची होऊन आल्याचेही त्यांनी सांगितलं. आपण त्याच्या विरोधात काही केस लढत असल्याने हे फोन येत असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितलं. आता त्यांच्या या धक्कादायक खुलाशांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळवली आहे.
जेलमध्ये कारण नसताना लावली होती सलाईन
अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात तीर्थयात्रा होते तशी माझी जेल यात्रा झाली होती असं सदावर्ते म्हणालेत. अटकेत असताना काहीही कारण नसताना आपल्याला सलाईन लावली होती. त्यावेळी आरएसएस चे डॉक्टर आपल्याला भेटले होते व त्यांनीच आपले प्राण वाचवले असा दावा सदावर्ते यांनी केला . जेलमध्ये आपल्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. या अंडा सेल मध्ये कसाब होता. व तिथे असलेला एक अधिकारी यांनी खंडाळ्यात तुमचा एन्काऊंटर झाला असता असं सांगितलं होतं असं म्हणाले.
हेही वाचा:
पाकिस्तानात राहते Sridevi यांची 'तिसरी मुलगी'; आता सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी भारतात दाखल