Big Boss 18: बिग बॉस 18 च्या पर्वात रविवारी सेलिब्रेटींची धमाल पहायला मिळणार आहे. लाफ्टर शेफचे विनोदवीरही आता बिग बॉसच्या घरात येणार आहेत. भारती कृष्णा घरात आल्यानं घरातील वातावरण हास्य विनोदाचं आणि खेळीमेळीचं झालं आहे. भारतीनं तर घरात आल्याआल्या ती गुणरत्न सदावर्तेंची फॅन असल्याचं सांगत त्यांना त्यांच्या स्टाईलनं इंट्रो द्यायला लावल्याचं दिसलं. मग सदावर्तेंनीही हम डाकूओंके खान्दानसे है असं म्हणत आपल्या विनोदी स्टाईलमध्ये इन्ट्रो देत सगळ्यांना पोट धरून हसवल्याचं पहायला मिळालं. लाफ्टर शेफ शोमधील कलाकारांच्या उपस्थितीमुळं बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचा धमाका सुरु असल्याचं दिसणार आहे.


गुणरत्न सदावर्तेंच्या शैलीनं प्रेक्षकही हसणार


बिग बॉस १८ च्या यंदाच्या पर्वात वादग्रस्त वक्तव्यांसह आपल्या खास विनोदी शैलीमुळं प्रसिद्धीझोतात आलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या आणखी एका मजेदार इंट्रो आता  कलर्स टीव्हीनंच शेअर केला आहे. यात भारतीनं सगळ्या स्पर्धकांचं कौतूक केलंच पण ती गुणरत्न सदावर्तेंची फॅन असल्याचंही तिनं सांगितलं. तांडव की रात सितारों की साथ असं म्हणत एन्ट्री करत भारतीनं मी तुमची फॅन आहे. हे कट टू कट बोलतात. असं म्हणत सदावर्तेंचं कौतूक केलंय.


हम डाकुओंके खान्दानसे...


हम डाकुओंके खान्दानसे आते है..हमरा नाम डॉ गुणरत्न सदावर्ते है.. असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी घरात सगळ्यांना हसवल्याचं दिसतंय. पेशावर वकील है..डंके की चोट पे बोलते है.. हमसे जो उलझते है उनको हम कमाल कर देते है.. असं म्हणत सदावर्तेंनी मजेशीर इंट्रो दिलाय.


 




बिग बॉसच्या घरात सलमानची कुकिंग


बिग बॉस 18 या रियालिटी शोची सध्या प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे . यात कोणता स्पर्धक कसा खेळतोय कोण काय वक्तव्य करतोय ..कुणाची कुणाशी मैत्री आहे ..या सगळ्या गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे . दरम्यान रविवारच्या एपिसोडमध्ये आज घरात हास्यकल्लोळ होणार आहे . लाफ्टर शेफ आणि बिग बॉसचा महासंघम असं म्हणत बिग बॉसच्या घरात सलमान खानलाच कुकिंग करायची वेळ आल्याचे दिसतय . भारती कृष्णा आणि या शोची टीम बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे . कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये भारती चक्क सलमानला कणिक मळायला लावल्याचं दिसतंय . तर दुसरीकडे सलमान ताक घुसळतानाही दिसतोय . या धमाल प्रोमो ची सध्या जोरदार चर्चा असून नेटकर यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत .