Gunaratna Sadavarte: बिग बॉस 18 रियालिटी शोमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रेक्षकांसहित सर्वांनाच धक्का बसतोय. त्यांच्या घरातील सहज व काहीसा विनोदी वावरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सदावर्तेंच्या बोलण्याची ढब प्रेक्षकांना आवडतेय. नुकतेच तुरुंगात असलेल्या तेजिंदर सिंह बघा सोबत त्यांची मैत्री झाली आहे . पण मैत्रीसाठी तुरुंगात जाण्याचा आदेश आल्यावर त्यांनी चिडून ओरडून घरच्यांसमोर अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असे म्हणत न्यायाधीशांसमोर युक्तिवाद मानतो अशी घोषणाच केली.
गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या निर्णयावर बोट ठेवत कर्मवीर मेहरा अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांना बिग बॉस विशेष अधिकार देतात. आणि म्हणतात की तुम्हा तिघांनी दोन लोकांची नावे निवडायचे आहेत. तिन्ही सदस्यांनी चाहत पांडे आणि गुणरत्न यांची नावे निवडल्यामुळे गुणरत्न सदावर्ते संतापल्याचे पाहायला मिळाले. यावर त्यांनी मला कायदेशीर युक्ती कशी खेळायची हे माहित आहे असं म्हणत.. सरकारही मला घाबरते असं वक्तव्य केलं.
नक्की बिग बॉस चा निर्णय काय होता?
खरंतर हेमा शर्मा आणि तेजिंदर सिंग बग्गा बिग बॉसच्या घरात पहिला दिवसापासून तुरुंगात आहेत. एक चांगला माणूस बनण्यासाठी त्यांनी चाहत पांडेंच्या जागी तुरुंगात जाण्याचे मान्य केले. मात्र हे दोन्ही सदस्य तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबीयांनी बिग बॉसला त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली होती. मग बिग बॉस ने हे त्यांना बाहेर काढले. पण त्यासाठी एक वेगळीच अट बिग बॉसने घातली. तेजिंदर सिंग बघा आणि हेमा शर्मा यांची तुरुंगवासाची मुदत संपुष्टात आली आहे पण तुरुंग रिकामे राहू शकत नाही अशी अट असल्याने दुसऱ्या दोघांना तुरुंगात जावे लागणार आहे.
दाऊदचा फोन.. खंडाळ्यातील एन्काऊंटर
गुणरत्न सदावर्ते यांनी घरात आल्यानंतर दोन दिवसातच आपली पकड चांगली बसवल्याचे दिसत आहे. घरात आल्यानंतर काहीच दिवसात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत सर्वांना धक्का दिल्याचे चित्र होते. आता सरकारही आम्हाला घाबरते असं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.