Emraan Hashmi On How to Shoot Liplock Scenes : अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. इम्रान हाश्मीने आपल्या सुरुवातीच्या टप्प्यातील चित्रपटात अनेक किसींग सीन दिले आहेत. त्यामुळे इम्रान हाश्मी याला सीरियल किसर अशी चाहत्यांनी ओळख दिली. मात्र, एका टप्प्यानंतर इम्रान हाश्मीने अशा प्रकारच्या भूमिका साकारणे कमी केले. प्रत्यक्ष आयुष्यात आपण तसे नसून किसींग सीन हे स्क्रिप्टमुळे करावे लागत असल्याचे इम्रानने म्हटले होते.
नुकतंच 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान हाश्मी याने चित्रपटात इंटिमेट सीन, लिपलॉक सीन कसा शूट केला जातो, हे सांगितले. बॉलिवूड चित्रपटात अनेकदा लिपलॉक कीस, इंटिमेट सीन्स असतात. या सीन्सची जोरदार चर्चा होत असते. अशा सीन्सची शूटिंग खरंच असल्याचे बहुतांशी प्रेक्षकांना वाटते.
कसा शूट केला जातो इंटिमेट सीन?
मुलाखतीत इमरान हाश्मीने सांगितले की, चित्रपटातील इंटिमेट सीन्स हे तांत्रिकदृष्ट्या शूट करण्यात येतात. अशा सीन्सच्या शूटिंग वेळी फार कमी लोक सेटवर असतात आणि यात टेक्निकचा वापर केला जातो. इम्रान हाश्मीने सांगितले की, ''सेटवर फार कमी लोक उपस्थित असतात, नाहीतर या सीन्सच्या शूटिंगमध्ये काही विशेष घडत नाही. चित्रपटाच्या उरलेल्या सीन्सच्या शूटिंगच्या वेळी बरेच लोक उपस्थित असतात, परंतु इंटिमेट सीन कमी लोकांमध्ये शूट केले जातात.
लिपलॉक सीन कसा शूट होतो?
इम्रान हाश्मी याने सांगितले की, लिपलॉक सीन्स हे कधीकधी ओरिजनल शूट केले जातात. तर कधी-कधी वेगवेगळे शूट केले जाते. वेगवेगळे शूट झालेले सीन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्र केले जातात. प्रेक्षकांना वाटते की हा सीन खरा आहे. लिपलॉक सीन्सच्या शूटिंगसाठी बऱ्याच अभिनेत्री उत्सुक नसतात. अभिनेतेदेखील अशा शूटच्या वेळी कम्फर्ट नसतात, असेही इम्रान हाश्मीने सांगितले.
इम्रान हाश्मीचे फिल्मी करिअर...
इम्रान हाश्मीने 2002 मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला 'मर्डर' (2004) या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. यानंतर इम्रान हाश्मीने 'मर्डर 2', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज 3', 'आवारापन', 'हमारी अधुरी कहानी', 'जेहर', 'जन्नत 2', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' 'टायगर 3' आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओटीटीवर त्याने दोन वेब सीरिजमध्येही काम केले आहे.