Astrology : सहसा अनेकांच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधलेला आढळतो. पण तो घालण्यासाठी काही खास नियम देखील असतात. वास्तविक काळा धागा शनिदेवाशी संबंधित आहे, त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना काळा धागा लाभतोच असं नाही. काही राशींच्या लोकांसाठी काळा धागा परिधान करणं फायद्याचं नाही, तर नुकसानीचं ठरू शकतं. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनी विचारपूर्वक काळा धागा घालावा, कारण काळा धागा शनिदेव आणि राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ शनि ग्रहाशी शत्रुत्वाची भावना बाळगतो. त्यामुळे काळा धागा घातल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच, तुमचं धैर्य आणि शौर्य यामुळे कमी होऊ शकतं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनीही हाताला किंवा पायात काळा धागा घालू नये, कारण कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्राची शनि आणि राहू यांच्याशी शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे काळा धागा धारण केल्याने तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तसेच, यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शनीच्या प्रभावामुळे सोपी कामंही अडकू शकतात.
सिंह रास (Leo)
काळा धागा घालणं सिंह राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतं, कारण तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि त्याचं शनिदेवाशी वैर आहे. त्यामुळे काळा धागा घातल्याने आत्मविश्वास कमी होतो. वडील आणि मुलांमध्ये मतभेद देखील वाढू शकतात.
वृश्चिक रास (Scorpio)
काळा धागा घालणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचं शनिदेवाशी वैर आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनीही काळा धागा घालणं टाळावं. जर त्यांनी विचार न करता काळा धागा घातला तर त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: