Elvish Yadav Arrested : युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी सीझन 2'चा (Bigg Boss OTT Season 2) विजेता एल्विश यादवला (Elvish Yadav) अखेर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता 17 मार्च रोजी पोलिसांनी त्याला 5 जणांसह अटक केली. त्याला सूरजपूर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टात पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मागील बऱ्याच महिन्यांपासून पोलिसांचा तपास सुरु होता. त्याचप्रमाणे एल्विशविरोधात एफआयआर देखील नोंदवण्यात आली होती. याशिवाय नोएडा जिल्हा रुग्णालयातही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
नोएडा सेक्टर 51 मधून 2 नोव्हेंबर 2023 रोजी बातमी समोर आली की, सेवरॉन बँक्वेट हॉलमधून 5 लोकांना अटक करण्यात आलीये. येथून पोलिसांनी एकूण 9 साप जप्त केले होते. त्यापैकी 5 कोब्रा, 1 अजगर आणि 2 दोन डोकी असलेला साप तसेच एक लाल साप सापडला. पोलिसांच्या चौकशीअंती या ठिकाणांचा वाप हा रेव्ह पार्ट्यांसाठी केला जात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर यामध्ये मुख्य आरोपी म्हणून एल्विशचं नाव पुढे आलं.
स्टिंग ऑपरेशनकरुन एल्विशचा पर्दाफाश
यानंतर एल्विशविरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांकडून एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. एका पोलिसांनी संपर्क साधला आणि त्याला कोब्राचं विष हवं असल्याचं सांगितलं. त्यानंतर एल्विशने त्या पोलीस अधिकाऱ्याला एका एजंटचा नंबर दिला. या सगळ्या पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये एल्विश सापडला आणि त्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी एल्विशवर कारवाई करत वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9, 39, 48A, 49, 50 आणि 51 अंतर्गत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एल्विश यादवची 3 तास चौकशी
8 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी एल्विश यादवची 3 तास चौकशी केली. नोएडा सेक्टर 20 पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी एल्विशने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला घरी पाठवलं. त्यावेळी एल्विशने आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याला पुरव्यांसह पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाऊ लागले.
प्रकरणात 5 आरोपींना अटक
11 नोव्हेंबर रोजी या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली. या प्रकणात अटक केलेल्या पाच आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. यामध्ये एल्विशची नेमकी काय भूमिका होती याचा तपास पोलिसांकडून सुरु होता.
आरोपी राहुलकडून पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती
11 नोव्हेंबर रोजी एक अपडेट आला की पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. यात एल्विशची भूमिकाही तपासली जात होती.त्यानंतर पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी राहुल याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. त्यावेळी त्याने या प्रकरणातली अनेक गुपितं उघड केलीत. हे संपूर्ण रॅकेट कसे चालवले जायचे याविषयी देखील त्याने सांगितलं. तसेच हे संपूर्ण काम ऑनलाइन झाल्याचंही त्याच्याकडून सांगण्यात येत होतं. रेव्ह पार्ट्या आयोजित करणं, त्यात साप आणणं, मध्यस्थांशी बोलणे आणि पैश्यांचे व्यवहार करणं ही सर्व काम ऑनलाइन केली जात असल्याचं एल्विशने सांगितलं.
एल्विश यादव आणि फॉरेन्सिक रिपोर्ट
यानंतर पोलिसांनी दीर्घ काळ चौकशी केली. त्यावेळी तपासानंतर सापांच्या विषाची चाचणी करण्यासाठी जयपूर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) मध्ये पाठवले. त्यावेळी 16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या त्या अहवालात रेव्ह पार्टीमध्ये कोब्रा-क्रेट प्रजातीच्या सापांचे विष पुरवण्यात आल्याचे उघड झालं. त्यानंतर नोएडा सेक्टर 49 मध्ये एल्विशसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
एल्विश त्यानंतरही चर्चेत
दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर एल्विशने 24 फेब्रुवारी स्वत:चा एक 13 मिनिट 34 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये त्याने म्हटलं की, जर पोलिसांनी माझ्यावरील आरोप सिद्ध केले तर मी डान्स करेन. रिवारच्या लोकांनी या प्रकरणी फार काही बोलू नका असे सांगितले होते पण आता मी बोलेन. तसेच माझ्यावर झालेले हे आरोप खोटे असल्याचंही एल्विशने यामध्ये म्हटलं होतं. त्याच्या या व्हिडिओमुळे एल्विश पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
17 मार्च रोजी एल्विश यादव नोएडा पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा एल्विश पोलिसांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे तिथून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.