Ekta Kapoor : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे.  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन कपूर(Arjun Kapoor) , रिया कपूर (Riya Kapoor) , नोरा फतेही (Nora Fatehi) , मृणाल ठाकुर (Mrinal Thakur) , जॉन अब्राहम (John Abraham) या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. दिग्दर्शक आणि निर्माती असणाऱ्या एकता कपूरला (Ekta Kapoor) देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. 


एकताची पोस्ट
एकताने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, 'सर्व नियमांचे पालन करून देखील मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी प्रकृती ठिक आहे. मी सर्वांना विनंती करते की माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. '






अभिनेता जॉन अब्राहमने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला कोरोना झाल्याचे सांगितले. त्याने पोस्टमध्ये लिहिले, 'तीन दिवसापूर्वी मी एका व्याक्तीच्या संपर्कात आलो होते, मला नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. माझी पत्नी प्रिया आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच क्वारंटाईन झालो आहोत. दोघांनीही लस घेतली आहे. आम्हाला सैम्य लक्षणं आहेत. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्कचा वापर करा. '


संबंधित बातम्या


AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?


John Abraham :  बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेता जॉन अब्राहमला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha