Fire in Mumbai : घाटकोपर येथील  असल्फा सुंदर बाग येथील डिसिलव्हा कपाउंडमध्ये एका कारखान्याला भीषण लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र, इतर घरांना झळ बसल्याने आग फैलावण्याचा धोका आहे. आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 


काच आणि सोफा बनवण्याच्या कंपनीला आग लागली असल्याची माहिती समोर आली. ही कंपनी भरवस्तीच्या भोवती असल्याने  आगीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता बळावली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास चार ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या अग्निशमन दलाचे 40 ते 50 जवान कूलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. 


 







कंपन्यांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, या आगीची झळ बसल्याने इतर घरांना आग लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेले ठिकाण असल्फा हे टेकडी असलेला भाग असून या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत.   


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha