Swapnil Joshi Reacts to Duniyadari Scene: मराठी सिनेसृष्टीत सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे दुनियादारी. 2013मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आजही हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटाने तरूण वर्गाची मने जिंकली होती.  या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 13 वर्षे उलटली. पण तरीही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही.  अजूनही या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दुनियादारीमधील फेमस जोडी अभिनेता स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर केली होती. 

Continues below advertisement

दुनियादारी चित्रपटातील 'तो' सीन व्हायरल

स्वप्नील जोशीनं श्रेयस ही भूमिका साकारली होती. तर, सई ताम्हणकरने शिरीनची भूमिका साकारली होती.   या सिनेमात स्वप्नील जोशीची भूमिका लक्षवेधी ठरली. दरम्यान, या चित्रपटात स्वप्नीलच्या नाकातून रक्त येतं.  या  सीनमुळे स्वप्नील जोशीला ट्रोल करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर हा सीन प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, अजूनही नाकातून रक्त येण्याच्या सीनवरून प्रश्न विचारण्यात येतो. दरम्यान, नुकतंच स्वप्नील जोशीने मुंबईतील महाविद्यालयातील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर देखील होती.  या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्यानं, "नाकातून रक्त कसं येतं?" असा थेट प्रश्न विचारला. 

मला चित्रपटासाठी साइन करणारे निर्माते....

या प्रश्नावर स्वप्नीलनं भन्नाट उत्तर दिलं. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. प्रश्न ऐकताच स्वप्नील आधी हसला. या प्रश्नावर उत्तर देत स्वप्नील म्हणाला, "नाकातून मी रक्त काढत नाही.  मला चित्रपटासाठी साइन करणारे निर्माते काढतात", असं उत्तर त्यानं दिलं. स्वप्नीलचं उत्तर ऐकून  उपस्थित प्रेक्षक खूप हसले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एकानं, 'आज अख्ख्या महाराष्ट्राला उत्तर मिळालं', अशी कमेंट केली. या कार्यक्रमात स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर  यांनी जेन झीच्या विविध प्रश्नांना उत्तर दिलं.  तसेच अमृतानं डान्स देखील केला. उपस्थितांची तिनं नृत्याद्वारे मनं जिंकली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस 19मधील जोडीचा पॅचअप? प्रणित मोरे अन् मालती चहरचा 'तो' VIDEO व्हायरल