Pranit More and Malti Chahar: बिग बॉस सिझन 19 प्रचंड गाजलं. या सिझनमधील कलाकारांनी हा खेळ उत्तमरित्या खेळला. मात्र, अभिनेता गौरव खन्नाने ट्रॉफी आपल्या नावे केली. शो संपल्यानंतरही या सिझनमधील कलाकार चर्चेत आहेत. काहींची या शोमुळे मैत्रीही झाली. काहींमध्ये नातं तयार झालं. तर, काहींच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या शोमधील अनेक जोड्या प्रेक्षकांना आवडल्या. यातीलच एक जोडी प्रेक्षकांना आवडली. ती गाजलेली जोडी म्हणजे प्रणित मोरे आणि मालती चहरची जोडी. दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. दोघांनी मिळून या शोमध्ये भरपूर कल्ला केला. परंतु, शोच्या शेवटी प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात खटके उडाले. दोघांमध्ये मतभेद झाले. सध्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघांमधील भांडण मिटले असल्याचं बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईमध्ये बिग बॉस सीझन 19मधील कलाकारांचे गेट-टुगेदर झाले. यावेळी या शोमधील स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांना भेटले. गौरव खन्ना, प्रणित मोरे, अशनूर कौर, आवेज दरबार यांची दुबईला जात असताना विमानतळावर भेट झाली. या ग्रुपमध्ये गप्पा टप्पा रंगल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, भेटीनंतर अशनुर आणि आवेज मिळून प्रणित मोरे आणि मालती चहरमधील भांडण दूर करण्याचा प्रयत्न करत होते. दोघांमधील भांडण सोडवून मैत्री घडवून आणत होते. याचा व्हिडिओ आवेज दरबारने शूट केला. तसेच सोशल मीडियात शेअर केला.
प्रणित आणि मालतीचा व्हायरल व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की, आवेज आणि अशनुर प्रणितला मालतीसोबत बोलण्याला लावत आहे. परंतु, प्रणित मोरे बोलण्यास नकार देतो. आवेज व्हिडिओ शूट करत प्रणितला म्हणतो की, "प्रणित तुझ्या मैत्रिणीशी बोल... आताच्या आता तिच्यासोबत बोल.." मालती चहर सोफ्यावर बसली असल्याचं दिसून येत आहे. यावर प्रणित कॅमेराकडे पाहून, "ये लोग व्ह्यूजचे भुकेले आहेत", असं म्हणताना दिसत आहे. नंतर प्रणित मोरे मालतीला 'हाय' असं म्हणताना दिसत आहे. यावेळी उपस्थित सर्वजण त्यांची मजा घेताना दिसत आहे.
सुरूवातीला प्रणित आणि मालती एकमेकांशी बोलताना अवघडल्यासारखे वागतात. पण नंतर हसत खेळत एकमेकांशी बोलतात. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रणित आणि मालतीच्या चाहत्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला.