Mumbai Drugs Case Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कालची रात्र आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.


दरम्यान शाहरुख खान आणि आर्यन खानचं फोनवर बोलणं झालं असल्याची माहिती आहे.  आर्यन खानच्या अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत लँडलाईन वरून 2 मिनिटांचं शाहरुख आणि आर्यनचं बोलणं झालं. आर्यन खान चौकशी दरम्यान सतत रडत आहे अशीही माहिती मिळाली आहे. तर आर्यन गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्स घेत असल्याचं चौकशीत उघड झालं आहे.  तर भारताबाहेर युके, दुबई आणि इतर देशात सुद्धा आर्यनने ड्रग्सचं सेवन केलं आहे. आर्यन आणि अरबाज हे 15 वर्षांपासून मित्र आहेत.



Drugs Case : आर्यन खानची रात्र NCBच्या कोठडीत, आज जामीन अर्जावर सुनावणी 


माहितीनुसार दिल्लीमध्ये सुद्धा एनसीबीसीकडून रेड सुरू असून अटक करण्यात आलेल्या लोकांच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू आहे. या प्रकरणात आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्रूझवर आले होते. ज्यामुळे एनसीबी कारवाईची चाहूल लागताच इतर मित्र जे ड्रग्स सेवन करतात ते पसार झाले.  अटक करण्यात आलेली मूनमुन धमेचा दिल्लीची एक मॉडल आहे. जी बड्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. मुनमुन चरसच सेवन करत होती. तर अटक करण्यात आलेला इस्मित चढा दिल्लीचा एक मोठा व्यावसायिक आहे तर मोहक जैस्वालचा सुद्धा मोठा व्यापारी आहे.  गोमीत चोपडा एक नावाजलेला हेयर स्टायलिस्ट असून दिल्लीच्या योजना विहार मध्ये राहणारा आहे. 


आर्यन खानला कालची रात्र कोठडीत काढावी लागली


आर्यन खानला कालची रात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत काढावी लागली. क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडतील. आर्यनवर ड्रग्जचं सेवन आणि खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्या जामिनावर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर इतर पाच आरोपी, म्हणजे नुपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल. 






एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता.


Mumbai NCB Raid: मोठं अपडेट! क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आठ जणांना एनसीबीकडून अटक


गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.


Cruise Drugs Party: क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि एनसीबीच्या छाप्यावर सुनील शेट्टींची प्रतिक्रिया, काय म्हणाले ते जाणून घ्या


एनसीबीने म्हटले आहे, की "ऑपरेशन दरम्यान, संशयितांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याकडून वेगवेगळे अंमली द्रव्य जप्त करण्यात आले, जे त्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये, अंडरवेअरमध्ये आणि (महिला) पर्समध्ये लपवले होते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आता न्यायालयात हजर केले जाईल. जे त्यांनी त्यांचे कपडे, अंतरवस्त्रे आणि (महिलांनी) पर्समध्ये लपवले होते.