Divyanka Tripathi : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) चा चाहता वर्ग मोठा आहे. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेतील दिव्यांकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सलग हिट मालिकांमध्ये काम केल्यानं दिव्यांका छोट्या पडद्यावरील टॉप अॅक्ट्रेस झाली आहे. एका मुलाखतीमध्ये दिव्यांकानं तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. 


दिव्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्यासोबत एक घटना घडली. ही घटना एका थिएटर बाहेर घडली. त्यावेळी सिंगल स्क्रिनचे तिकीट ब्लॅकनं विकलं जात होतं. त्यामुळे थिएटर बाहेर खूप गर्दी होती. मी तिकीट विकत घेण्यासाठी लाइनमध्ये थांबले होते. तेव्हा गर्दीचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. '


दिव्याकानं लगावली कानशिलात
दिव्यांका सांगितलं की, 'तेव्हा मला खूप राग आला. मी त्या व्यक्तीचा हात पकडला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मी हाथ सोडला नाही. नंतर मी त्याचा हात ओढून त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तेथील लोकांनी त्या व्यक्तीला मारायला सुरूवात केली. '


'बनूं मैं तेरी दुल्हन'मधून केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं


कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नसून देखील तिनं या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला. भोपाळमध्ये राहणारी दिव्यांका अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला आली. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेमधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  दिव्यांका मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1.50 लाख मानधन घेते. तसेच मुंबईमध्ये तिचे चांगले घर देखील आहे. दिव्यांकाच्या या घराची किंमत जवळपास चार कोटी आहे. दिव्यांकाकडे बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. तसेच दिव्यांकाकडे एकूण 20 कोटींची संपत्ती आहे. वर्षभरात ती जवळपास दिड कोटी रूपये कमावते. ये है मोहब्बतें या मालिकेमधील दिव्यांकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा :