Director Ranjith Booked Sexually Assaulting Man : प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याने लैंगिक छळाची तक्रार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात एका अभिनेत्याने लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका 31 वर्षीय अभिनेत्याने दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन याने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याने तक्रारीत म्हटलं आहे की, दिग्दर्शकाने हॉटेलमध्ये बोलून त्याच्यावर लैंगिक छळ केला.
अभिनेत्याचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार
मल्याळम इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही काळापासून लैंगिक छळाच्या विविध घटना समोर येत आहेत. आता अभिनेत्यावर लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. बंगुळुरुमधील एका अभिनेत्याने निर्माता-दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलवून दिग्दर्शकाने लैंगिक छळ केल्याने अभिनेत्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल
अभिनेत्याने सांगितले की, तो दिग्दर्शक रंजितला पहिल्यांदा कोझिकोडमध्ये भेटला होता, जेव्हा ते दिग्दर्शक 'बावुतीयुदे नमाथिल' चित्रपटाचे शूटिंग करत होते. पीडित अभिनेत्याने तक्रारीत सांगितलं की, दिग्दर्शकाने ऑडिशनच्या बहाण्याेने त्याला हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याचा लैंगिक छळ केला.
"मला हॉटेलमध्ये बोलावून माझं कपडे काढायला लावले"
अभिनेत्याने सांगितलं की, रंजितने त्याला डिसेंबर 2012 मध्ये बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि तेथे ऑडिशन असल्याचे सांगितलं. पण तिथे रंजीतने त्याला जबरदस्तीने कपडे काढायला लावले. सुरुवातीला अभिनेत्याला वाटलं की, हा ऑडिशनचा एक भाग आहे.
अभिनेत्रीनेही केली लैंगिक छळाची तक्रार
तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक रंजितविरोधात अभिनेत्याने लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधीही रंजीतवर एका बंगाली अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीने तिची तक्रार कोची पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे पाठवली होती. या तक्रारीमध्ये पीडित बंगाली अभिनेत्रीने आरोप केला होता की, रंजितने तिला 2009 मध्ये 'पलेरी मणिक्यम' चित्रपटाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावले होते आणि तिला अश्लील प्रकारे स्पर्श केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जेव्हा रतन टाटा यांनी बिग बींकडून मागितलेले पैसे..., मित्राच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन भावुक