Bigg Boss 18: दुहेरी ॲनिमेशनच्या आठवड्यानंतर बिग बॉसच्या घरात आता स्पर्धकांनी जोरदार सुरुवात केली आहे. Weekend ka vaarमध्ये नायरा बॅनर्जी आणि मुस्कान बामणेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. आता सोमवारचा एपिसोडमध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा पुन्हा एकदा आमने-सामने आलेले दिसतात. चोरीच्या आरोपावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आहे. दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आता करणवीर आणि इतर सदस्यांपासून दूर झाल्याने दुसऱ्या गटात मतभेद निर्माण झाल्याचं दिसतयं.
अविनाशने केला कॉफी चोरल्याचा आरोप
कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमो मध्येही करणवीर आणि अविनाश भांडण दिसून येत आहे. यात पहाटे अविनाश मिश्रण करणवीर मेहरा यांच्यात वाद होतो. करणवीर मेहरा जिम मध्ये व्यायाम करत असतो. यावेळी अविनाश थेट करणवीरकडे बोट दाखवून कॉफी चोरी केल्याबद्दल बोलतो. यावर करण नाराज होतो आणि म्हणतो मला प्यायचे असेल तर मी समोरून कॉफी घेईन. मला चोरी करायची गरज नाही. चोराच्या घरातल्या चोरीला कोणी चोरी म्हणतात का असं उपहासाने करणवीर म्हणतो. या वादाचे पुढे भांडणात रूपांतर झाल्याचा दिसलं.
माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावल तर...
माझी कॉफी कोणी चोरली असे म्हणत अविनाश मिश्रा करणवीरला विचारतो. तेव्हा मी समोर जाऊन घेईन मला चोरायची गरज नाही असा म्हणत या वादावादीला सुरुवात झाली. जर कोणी माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावताना दिसला तर त्याचा हात उपटून फेकून देईन.. असं म्हणत करणविरही चिडला.
श्रुतिका अर्जुन मित्रांपासून गेले दूर
एकीकडे करणवीर अविनाशचे भांडणं सुरु आहेत. पण दुसरीकडे श्रुतिका, अर्जुन आणि तिचे मित्र करणवीर आणि शिल्पा शिरोडकर चुम दरंगपासून दूर पळताना दिसत आहेत. ते तिघेही बसून चर्चा करत आहेत. की श्रुतिका बोलत नाहीये. यावर करण म्हणतो या कृतीमुळे ती चिडली आहे.
घरात नवा टाईम गॉड निवडला जाणार
सोमवारच्या नव्या एपिसोड मध्ये एकीकडे वादावादीचे आणि गोंधळाचे रूप असताना स्पर्धकांमध्ये आणखी एक संघर्ष उभारणार आहे तो टाईम गॉडचा. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा टाईम गॉडच्या टास्कचा दिवस आला आहे.