Celebs Bodyguard Salary : बॉलिवुडमधील काही स्टार्स असे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी एका क्षणाला हजारो लोक गर्दी करतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला एकदा तरी पाहता यावे, यासाठी चाहते जिवाचं रान करतात. त्यामुळेच लोकांची गर्दी पाहता या सिनेकलाकारांना अगदी कडक सुरक्षा पुरवली जाते. विशेष म्हणजे यातील काही स्टार्सना स्वत:चे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान हे दोन्ही स्टार्स आपल्या बॉडिगार्ड्सना करोडो रुपये पगार देतात, असं म्हटलं जातं. असं असतानाच आता त्यांच्या बॉडिगार्ड्सना खरंच तेवढा पगार दिला जातो का? हे समोर आलं आहे.
शाहरुख, सलमान खान आपल्या बॉडीगार्ड्सना कोट्यवधी रुपये देतात?
गेष्या अनेक वर्षांपासून रवी सिंह हा सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करतो आहे. तर सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी शेराकडे आहे. या दोघांनाही कोट्यवधी रुपये पगार म्हणून मिळतात, असं म्हटलं जातं. यावरच आता सिक्योरिटी कन्सल्टंट युसुफ इब्राहीम यांनी या अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बॉडीगार्ड्सना दिल्या जाणाऱ्या पगारावर भाष्य केलंय. इब्राहीम यांनी दिलेल्या माहितीनुसार कलाकार आपल्या सुरक्षेसाठी बरेच पैसे खर्च करतात. याच कारणामुळे शाहरुख खान आपला सुरक्षारक्षक रवी सिंहला पगार म्हणून 2.7 कोटी रुपये देतो तसेच सलमान खान शेरा याला 2 कोटी रुपये देतो, असे सांगितले जाते. याबाबत इब्राहीम यांना प्रश्न विचारण्यात आला.
शाररुख खानच्या बॉडीगार्डची स्वत:ची कंपनी
शाहरुख खान आपल्या बॉडीगार्डला खरंच 2.7 कोटी रुपये पगार देतो का? असे विचारल्यानंतर इब्राहीम यांनी सांगितले की, या बॉडीगार्ड्सना किती रुपये पगार मिळतो, याबाबत आम्हाला माहिती मिळत नाही. मात्र एवढा पगार शक्य नाही, असे मला वाटते. शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीने सुरक्षा पुरवण्याची आपली स्वत:ची कंपनी चालू केली आहे. या माध्यमातून तो किती रुपये कमवते हे सांगता येणार नाही, असे इब्राहीम यांनी सांगितले. युसुफ इब्राहीम हे शाहरुख खानला पूर्णपेळ सुरक्षा देणे शक्य नव्हते. त्यामुळे इब्राहीम यांनी शाहरुखच्या सुरक्षेची जबाबदारी रवी सिंहवर सोपवली होती. आता रवी सिंहने सुरक्षा पुरवण्याची आपली स्वत:ची कंपनी चालू केली आहे.
सलमान खानच्या बॉडीगार्डसचाही स्वत:चा व्यवसाय?
सलमान खानच्या बॉडीगार्डला मिळणाऱ्या पगाराबाबत इब्राहीम यांनी सांगितले. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याचा स्वत:चा व्यवसाय आहे. शेराचीदेखील स्वत:ची सुरक्षा कंपनी आहे. मला वाटतं की शेराचे स्वत:चे आणखी काही बिझनेस आहेत. त्यामुळे तो एवढा पगार कमावत असावा, असे इब्राहीम यांनी सांगितले.
सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सचा पगार किती असू शकतो?
युसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेतारकांच्या बॉडीगार्ड्सचा पगार 25000 रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकतो. यासह बॉडीगार्ड्सच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चाची, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील सिनेस्टार्स घेतात. युसुफ इब्राहीम हे आलिया भट्ट, वरुण धवन यासारख्या प्रसिद्ध सिनेस्टार्सना सुरक्षा पुरवतात.
हेही वाचा :
Almost Comedy : आता लेखक बनणार कॉमेडीयन! मराठी स्टँडअप कॉमेडी शो' ऑलमोस्ट कॉमेडी'