Diljeet Dosanj Concert: दिलजीत दोसांझचा चाहतावर्ग काही कमी नाही. त्याच्या प्रत्येक शोसाठी हजारो रुपयांचे तिकीट काढून त्याच्या गाण्याला भरभरून प्रतिसाद देणारे चाहते तर आहेतच. पण नुकत्याच झालेल्या त्याच्या जयपूरच्या परफॉर्मन्समध्ये एक वेगळीच घटना घडल्याचे दिसले. दिलजीत चं गाणं ऐकायला चहा ते काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा त्याच्या नुकत्याच एका झालेल्या कॉन्सर्टमध्ये सिद्ध झालंय. दिलजीत दोसांझची एक चाहती चक्क स्वतःचा साखरपुडा सोडून त्याच्या कॉन्सर्टला आली होती. तिच्या या प्रेमाने भारावून गेलेल्या दिलजीतनेही तिला एक खास भेट दिली आणि त्याचही या चाहतीला प्रेम असल्याचं सांगितलं.


साखरपुडा सोडून कॉन्सर्टला आली 


दिलजीत दोसांझ हा त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाने कायमच चर्चेत असतो. मागच्या कॉन्सर्ट मध्ये त्याने एका पाकिस्तानी चाहतीला सुंदर भेट देत स्टेजवर बोलावले होते. आता आणखी एका चाहतीला दिलजीतने खास भेट दिली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी दिलजीतच्या कॉन्सर्टसाठी तिचा स्वतःचा साखरपुडा सोडून आली होती. दिलजीत ने या कॉन्सर्ट विषयी instagram वर पोस्टही केली आहे. या मैफिलीनंतर आणि आधी एक व्हिडिओ शेअर करत त्याने त्याचा अनुभव पोस्ट केला.


 






दिलजीतने चाहतीला गिफ्ट देत जिंकली चाहत्यांचे मन 


या फॅनने केलेल्या कृतीवर दिलजीत कृतज्ञ झाला. स्वतःचा साखरपुडा सोडून कॉन्सर्ट ला आलेला चाहतीला दिलजीतने त्याचे काळे रॅकेट काढून दिले. आणि त्याचेही तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. त्याच्या या कृतीने सगळ्यांनी दिलजीतसाठी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.


 






तिकीट घोटाळ्याप्रकरणी दिलजीतची माफी


नुकताच कथित तिकीट घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या फॉलोअर्सना दिलजीतने खेद व्यक्त केला. जयपूरमधील रविवारच्या कार्यक्रमात संगीतकाराने समस्या मान्य केली आणि क्षणात त्याबद्दल माफी मागितली.तो म्हणाला "जर कोणी तिकीट घोटाळ्याला बळी पडले असेल तर मी त्या व्यक्तीची माफी मागतो. आम्ही असे केलेले नाही. अधिकारी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. असं दिलजीतनं सांगितलं.