Salman Khan Box Office Record In 7 Years: बॉलिवुडच्या दुनियेत सलमान खान या नावाला फार महत्त्व आहे. सिनेसृष्टीत सलमान खानचे वेगळे असे वजन आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना अभिनय क्षेत्रात आणून त्यांना मोठं नाव मिळवून दिलं आहे. सलमानचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. मात्र सलमानची तरुण-तरुणींमध्ये वेगळी क्रेझ असली तरी गेल्या सात वर्षांपासून हा अभिनेता बॉक्स ऑफिसवर खास कमाल करू शकलेला नाही. या अभिनेत्याचे गेल्या सात वर्षांतील सर्वच चित्रपट सुमार चालले. त्यामुळे आता त्याचा आगामी सिकंदर हा चित्रपट त्याला वाचवणार का? असे विचारले जात आहे.
सात वर्षांपासून लय सापडलेली नाही
गेल्या काही दिवसांपूर्वी वरुण धवन या अभिनेत्याचा बेबी जॉन हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासह सलमान खान सिंगम अगेन या चित्रपटातही दिसला. सलमान खानचा शेवटचा चित्रपट 2023 साली आला होता. या चित्रपटाचे नाव टायगर-3 असे होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. याआधी 2017 साली त्याचा टायगर जिंदा है हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने हा चिज्ञपट मात्र सुपरहिट ठरला होता. सलमान खानचा सुपरहिट ठरलेला हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाने एकूण 339.16 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर मात्र गेल्या सात वर्षांपासून त्याचा एकही चित्रपट ब्लॉकबस्टर या श्रेणीत गेलेला नाही. त्यामुळेच त्याचा आगामी सिकंदर हा चित्रपट सलमान खानला साथ देणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
सलमान बॉक्स ऑफिसवर खास कमाल करु शकला नाही
टायगर जिंदा है या चित्रपटानंतर सलमान खानचा 2018 साली रेस-3 हा चित्रपट आला होता. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुमार ठरला. त्यानंतर 2019 साली त्याचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिट ठरला. मात्र सुपरहिट ही बिरुदावली त्याला मिळू शकली नाही. त्यानंतर 2018 साली दंबग-3 हा चित्रपट आला होता. हा चित्रपटही सुमार ठरला. 2021 साली त्याचा राधे हा चित्रपट आला. त्यानंतर 2022 साली त्याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट चक्क फ्लॉप ठरले.
सलमान खानसोबत दिसणार रश्मिका मंदाना
टायगर-3 हा चित्रपट 300 कोटी रुपयांत तयार झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फक्त 286 कोटी रुपये कमवू शकला होता. त्यामुळे हा चित्रपटदेखील फ्लॉपच ठरला होता. 2024 साली सलमानचा एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर आता 20205 साली त्याचा सिकंदर हा चित्रपट येत आहे. सलमान खान या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करण्याची आशा व्यक्त केलीज जात आहे. सिकंदर या चित्रपटाचे टिझर रिलिज झालेले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाल करणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हेही वाचा :
Almost Comedy : आता लेखक बनणार कॉमेडीयन! मराठी स्टँडअप कॉमेडी शो' ऑलमोस्ट कॉमेडी'
Bada Naam Karenge : रिषभ अन् सुरभीची Old School लव्ह स्टोरी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरीज