Suresh Dhas on Walmik karad : बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा पाच दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला आहे. मात्र, सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं. तुमच्याकडे असा कोणता अॅटम आला आहे का? 10 लाख डालो 5 कोट मिळवो असेही सुरेश म्हणाले. या महोत्सवाचे काम मुंबईतील एका एजन्सीला मिळालं होतं, ते काढून वाल्मिक कराडने मिनाज फारुकी नावाच्या व्यक्तीला दिलं होतं.  मिनाज फारुकीचे सुद्धा अकांउंट चेक करा म्हणून मी सीबीआयकडे आणि ईडीकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे धस म्हणाले.  


10 लाख खर्चा 4 कोटी 90 लाख जेब मे 


मिनाज फारुकी हा परभणी जिल्ह्यातील आहे. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि मिनाज फारुकी यांचे फोटो देखील दाखवले. यांनी पाच कोटी रुपयांचे बिल सरकारकडून काढले आहे. 10 लाख खर्चा 4 कोटी 90 लाख जेब मे असेही सुरेश धस म्हणाले. मग वाल्मिकला ईडीची नोटीस येईल नाहीतर काय येईल? ही घ्या ईडीची नोटीस असंही सुरेश धस म्हणाले. 2-2-2024 ला वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आल्याचे सुरेश धस म्हणाले. हा वाल्मिक अण्णांचा प्रताप असल्याचे सुरेश धस म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश धस बोलत होते. 


सुरेश धस यांची मंत्री धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका


संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 7 जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा आरोपीसुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302  झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले. यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून काढा अशी मागणी देखील केली.


महत्वाच्या बातम्या:


संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल