Continues below advertisement

मुंबई : जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओज प्रस्तुत धुरंधर या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा बॉलिवूडच्या प्रेमात पाडले आहे. दमदार अभिनय आणि वेगळी कथा यामुळे चित्रपट चर्चेत असतानाच, त्याचे संगीत विशेष लक्ष वेधून घेत आहे. या अल्बममधील प्रत्येक गाणे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे धुरंधरच्या अल्बमने इतिहास रचला आहे, यात नवल नाही.

धुरंधरच्या संपूर्ण अल्बममधील सर्व 11 गाणी Spotify ग्लोबल टॉप 200 मध्ये स्थान मिळवून आहेत. याशिवाय ही सर्व गाणी Spotify इंडिया टॉप 200 मध्येही आहेत. हा अल्बम Spotify ग्लोबल टॉप अल्बम्स चार्टवर #2 क्रमांकावर तर Spotify US टॉप अल्बम्स चार्टवर #5 क्रमांकावर पदार्पण करून बसला आहे.

Continues below advertisement

चित्रपटाचे शीर्षकगीत धुरंधर #3, इश्क जलाकर आणि करवाँ #5, तर गहिरा हुआ #7 क्रमांकावर आहे. उर्वरित गाणीही चार्टवर आपले वर्चस्व कायम ठेवून आहेत. Apple Music India वरही धुरंधरने #1 अल्बमचे स्थान मिळवले आहे.

बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपटाने यापूर्वी अशी कामगिरी केलेली नाही! आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचा अल्बम Spotify ग्लोबल चार्टवर #2 क्रमांकावर पोहोचला असून, जगभरातील प्रेक्षक ही गाणी ऐकत असल्याचे यावरून स्पष्ट होते. चित्रपटाला मिळालेली ही जागतिक ओळख बॉलिवूडसाठी एक मोठा टप्पा ठरते. यामुळे धुरंधर हा Spotify वर जागतिक पातळीवर सर्वाधिक यशस्वी पदार्पण करणाऱ्या भारतीय चित्रपट अल्बमपैकी एक ठरला आहे.

या यशाने भारावून गेलेले संगीतकार व सुपर प्रोड्युसर शाश्वत सचदेव म्हणाले, “मी कधीही या अल्बमकडे आकड्यांच्या शर्यतीसारखे पाहिले नाही. धुरंधर विश्वास, मैत्री आणि संगीतावरील प्रेमातून हळूहळू तयार झाला. सर्व ११ गाणी चार्टवर स्थान मिळवत आहेत आणि त्यातील काही गाणी अगदी सर्वोच्च स्थानी पोहोचली आहेत, हे पाहणे अत्यंत नम्र करणारे आहे. या यशाचे श्रेय प्रत्येक कलाकार, संगीतकार, इंजिनिअर आणि सहकाऱ्यांना जाते, ज्यांनी या गाण्यांत आपला आत्मा ओतला. मी शब्दांत व्यक्त न करता येईल इतका कृतज्ञ आहे, आणि संगीताला त्याचे श्रोते मिळाले याचा मला आनंद आहे.”

धुरंधर हा एक हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन-थ्रिलर असून, त्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन अशी तगडी स्टारकास्ट आहे. जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग घेतली असून त्याची घोडदौड अजूनही सुरू आहे.

ही बातमी वाचा: