Dhurandhar Box Office Collection Day 14: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie) 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. आज प्रदर्शित होऊन तब्बल चौदा दिवस उलटलेत, तरी हा सिनेमा धुवांधार कमाई करतोय. सिनेमात रणवीर सिंहनं (Ranveer Singh) हमजाची भूमिका साकारली आहे. तर, अक्षय खन्ना (Akshaye Khanna) गँगस्टर रहमान डकैतच्या (Rehman Dakait) भूमिकेत झळकला आहे. या सिनेमातल्या स्टारकास्टनं सर्वांना वेड लावलंय. सिनेमानं कित्येक दिग्गजांना आपल्या कलेक्शनच्या (Box Office Collection) धुळीत लोळवलं आहे. 'धुरंधर'नं फार कमी दिवसांत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता सिनेमा 500 कोटींपासून फक्त काही पावलं दूर आहे.
'धुरंधर'नं दाखवून दिलंय की, जेव्हा प्रेक्षक खरोखर सिनेमावर प्रेम करतात, तेव्हा रेकॉर्ड्सचाही पाऊस पडतो. फक्त दोनच आठवड्यांच सिनेमानं 400 कोटींचा टप्पा गाठला असून आता लवकरच सिनेमा 500 कोटींच्या जवळ जाणार आहे.
दुसऱ्याच आठवड्यात 'धुरंधर'चं धुवांधार कलेक्शन (Dhurandhar Box Office Collection)
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमानं तब्बल 32 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 43 कोटींची कमाई केली आहे. यामुळे पहिल्या आठवड्यात एकूण कलेक्शन 207.25 कोटींवर पोहोचलं आहे. 'धुरंधर'साठी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात सिनेमानं त्याच्या पहिल्या सिनेमापेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे. या सिनेमानं नवव्या दिवशी 53 कोटी आणि नंतर दहाव्या दिवशी 58 कोटी रुपये कमावले आहेत.
अशातच आता 'धुरंधर'च्या चौदाव्या दिवसाच्या कमाईचे अर्ली ट्रेंड्सही आले आहेत. 'धुरंधर'नं 19व्या दिवशी 19.97 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. या हिशोबानं फिल्मची एकूण कमाई 457.22 कोटी रुपये झाली आहे.
'या' सिनेमांना सोडलं मागे
'धुरंधर'नं पाचच दिवसांत 200 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 'धुरंधर'नं 'पुष्पा 2'चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 'धुरंधर'नं फक्त सहा दिवसांत 230 कोटींची कमाई करुन 'पुष्पा 2' (196.50 कोटी रुपये), छावा (180.25 कोटी रुपये), बाहुबली 2 (143.25 कोटी रुपये) आणि स्त्री 2 (141.40 कोटी रुपये) च्या दुसऱ्या आठवड्याच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :