Parli Crime News : परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्युत निर्मिती केंद्रात असलेल्या कुलिंग टावर ते मेटकॉंन टॉवर परिसरात स्क्रॅप साहित्य आणि स्क्रॅप चोरून (Crime News) नेत असताना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी एका तरुणाला पकडल्याची घटना घडली. वैभव मोठे असे या तरुणाचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेले अन्य चार जण इथून पसार झालेत. या प्रकरणी पाच जणाविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फरार व्यक्तींचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. (Scrap theft in Parli Thermal Power Plant) 

Continues below advertisement

Parli Crime News : पाचही जण सुरक्षा भेदून दुचाकी आणि ऑटोसह केंद्रात दाखल 

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रासारख्या अतीसंवेदनशील परिसरात हे पाचही जण सुरक्षा भेदून दुचाकी आणि ऑटोसह हे पाच जण दाखल झाल्याने विद्युत निर्मिती केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्युत केंद्रात प्रवेश करण्यासाठी गेट पासची आवश्यकता असते. विशेष म्हणजे आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची झाडाझडती घेऊन आत सोडले जाते. असे असतानाही पाच व्यक्ती दुचाकी आणि ऑटोसह विद्युत निर्मिती केंद्राच्या आत कसे गेले? याची चर्चा आता होऊ लागली आहे.

Continues below advertisement

Scrap theft in Parli Thermal Power Plant : पाच जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, या चोरीसाठी वापरलेली मोटार सायकल आणि ऑटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Parli News : शेतरस्ता खुला होत नसल्याने शेतकऱ्याचे सिरसाळा-औरंगपूर मुख्य मार्ग बंद करत आंदोलन

शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने परळी तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून चक्क रहदारीसाठी वापरात असलेल्या शिरसाळा- औरंगपूर रस्ता बंद करत आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 24 तासापासून हे आंदोलन सुरू असून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात आलय.

गेली दोन वर्षापासून सिरसाळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर दहिफळे, उद्धव दहिफळे या दोन्ही भावांनी गट नंबर 390 मधील शेत रस्ता खुला करून देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती यावर अनेक सुनावण्या देखील झाल्या.तीन महिन्याखाली दहिफळे यांनी परळी तहसील परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता.असे असतानाही रस्ता खुला न झाल्याने दहिफळे बंधूंनी थेट सिरसाळा - औरंगपूर मुख्य मार्गावर मुरूम टाकत रस्ता बंद केला आहे. शेत रस्ता करून देईपर्यंत रस्त्यावर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा