Dhurandhar Fame Danish Pandor: सध्या 'धुरंधर' सिनेमा तुफान गाजतोय, फक्त देशातच नाहीतर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. भारतीय सिनेमांना पाकिस्तानात बंदी असूनही 'धुरंधर' पाकिस्तानात गाजतोय. तिथले लोक पायरेटेड वेबसाईट्सवरुन डाऊनलोड करुन 'धुरंधर' पाहतायत. 'धुरंधर' सिनेमातल्या कलाकारांचंही कौतुक करत आहेत. अक्षय खन्ना, रणवीर सिंह, संजय दत्त यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एक कलाकार या सुपरस्टार्ससमोर भाव खाऊन गेलाय, तो म्हणजे, दानिश पांडोर (Danish Pandor). दानिश पांडोरनं सिनेमात उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. त्याच्या कामाचंही कौतुक होतंय. अशातच आता दानिश पांडोरनं मुलाखतीत सिनेमाच्या शुटिंगवेळीचे अनुभव आणि सिनेमा शूट झाल्यानंतर मिळालेली प्रसिद्ध यावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

2025 चा थ्रिलर 'धुरंधर'मध्ये अभिनेता दानिश पांडोर गँगस्टर उजैर बलोचची भूमिका साकारताना दिसतोय आणि त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचं पात्र एका शांत आणि शक्तिशाली गुंडाचं आहे, जे अक्षय खन्नाच्या रहमान डकैतच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे. दानिशचे बहुतेक सीन्स रणवीर सिंहसोबत आहेत आणि दोन्ही कलाकारांनी एकमेकांच्या टीमवर्कचं कौतुक केलं आहे. चित्रपटाच्या यशानंतर, त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालंय.  

दानिश पांडोर काय म्हणाला? (Danish Pandor On Dhurandhar)

अभिनेता दानिश पांडोर म्हणाला की, "ही खूपच भारी फिलिंग आहे... मला खूप छान वाटतंय... माझं काम लोकांना आवडतंय, आमच्या मेहनतीचं चीज होताना दिसतंय... आम्ही या सिनेमासाठी खूप मेहनत घेतलीय. मी दीड वर्ष या सिनेमासाठी तयारी करतोय, तर आदित्य सरांनी 5 वर्ष सिनेमासाठी दिलीत. मला पाकिस्तानातूनही प्रेम मिळतंय... तुमची भूमिका लोकांना आवडतेय यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते..."

Continues below advertisement

"मी माझ्या भूमिकेवर खूप मेहनत घेतली होती. मी चालण्याची प्रॅक्टिस करत होतो. ही भूमिका साधी ठेवायचीय, असं आदित्य सरांनी मला सांगितलेलं. भूमिका समजण्यासाठी मला 2-3 दिवस गेले. त्यानंतर मी भूमिकेत सामावून गेलो... त्यामुळेच लोक माझ्या भूमिकेवर इतकं प्रेम करत आहेत. माझ्या सगळ्या चाहत्यांना मी धन्यवाद म्हणू इच्छितो...", असं दानिश पांडोर म्हणाला. 

दानिश पांडोर कोण? (Who Is Danish Pandor?)

22 डिसेंबर 1987 रोजी मुंबईत जन्मलेल्या दानिश पांडोरनं मॉडेलिंग मधून इंडस्ट्रीतल्या आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2007 मध्ये त्यानं ग्लॅड्रॅग्स मॅनहंटमध्ये भाग घेतला आणि टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं. अभिनयाची त्याची आवड हळूहळू वाढत गेली आणि कॉलेजमध्ये शिकत असतानाच अभिनयाचे धडे गिरवले. दानिश पांडोरनं टेलिव्हिजनच्या जगात प्रवेश केला आणि 'कितनी मोहब्बत है' या चित्रपटातून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर तो 'एजंट राघव', 'क्राइम ब्रांच' आणि 'इश्कबाज' सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसला. 'सेक्रेड गेम्स'मधील 'बडा बद्रिया' या भूमिकेमुळे त्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप पाडली. 'मत्स्य कांड' आणि 'बॉम्बर्स'सारख्या वेब सीरिजमध्येही त्यानं आपली छाप पाडली आणि हळूहळू एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्वतःला स्थापित केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar Record In Pakistan: देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; बंदीमुळे रिलीज झाला नाही, तर पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्याचा वाढला ट्रेंड