Dhurandhar 2 on OTT: धुरंधर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर 1600 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर आता प्रेक्षक धुरंधर 2 OTT वर कधी रिलीज होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.(Dhurandhar 2) थिएटरमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर ‘धुरंधर 2’ आता OTT प्लॅटफॉर्मवरही धमाका करणार आहे. (Dhurandhar 2 the Revenge)

Continues below advertisement

रणवीर सिंहच्या या स्पाय-थ्रिलर सिनेमाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडलेत.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम?

‘धुरंधर’चा पहिला भाग नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. मात्र, ‘धुरंधर 2’ नेटफ्लिक्सवर येणार नसल्याचं कळतंय. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे OTT हक्क Jio Hotstar ला विकले आहेत. त्यामुळे हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याची चर्चा आहे.

Continues below advertisement

कधी येणार OTTवर?

मीडिया रिपोर्टनुसार, Jio Hotstar ‘धुरंधर 2’ला (IPL) Indian Premier League 2026 नंतर रिलीज करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा चित्रपट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात OTTवर येण्याची शक्यता आहे.मात्र, अद्याप मेकर्स किंवा प्लॅटफॉर्मकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने 1660 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे, तर भारतात 1200 कोटींपेक्षा अधिक ग्रॉस कलेक्शन आहे.विशेष म्हणजे, सर्वात कमी वेळात 1000 कोटी नेट कलेक्शन करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला ‘धुरंधर 2’ आता OTTवरही तितकाच गाजेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

धुरंधर 2 ची कथा काय?

'धुरंधर द रिव्हेंज' या चित्रपटाची कथा जसकीरथ सिंह रंगी याचा प्रवासाला पुढे नेत आहे. हमजा अली मजारी या नावाने तो कराचीच्या अंडर वर्ल्ड मध्ये शिरकाव करतो आणि पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसतो. दिग्दर्शक आदित्यधर यांनी हा ॲक्शन थ्रिलर साकारला असून यात जसकीरत गॅंगवॉर, स्थानिक संघर्ष आणि मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा सामना करताना दिसतो. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल,संजय दत्त,आर माधवन, सारा अर्जुन,राकेश बेदी, गौरव गेरा,दानिश पांडोर, मानव गोहिल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.