Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातीलभाविकांच्या बसचाअपघात (Accident News)झालाआहे. गुरुवारी घडलेल्याया हृदयद्रावक घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. वाराणसी-गोरखपूर महामार्गावर (Varanasi-Gorakhpur Highway) भाविकांची पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने हिघटनाघडल्याचीमाहिती आहे. यात बुलढाण्यातील (Buldhana) भाविक - श्रद्धाळूंच्या समावेशअसून गाझीपूरजवळ (Ghazipur Accident News) हा अपघात घडलाआहे. घटनेचीमाहितीमिळताचपोलिसांचेपथकघटनास्थळीदाखलझालेअसूनत्यांनीपुढीलकारवाईसुरुकेलीय. तरजखमींवरसध्या गाझीपूर सिव्हिल रुग्णालयाला उपचारसुरुआहे.
Ghazipur Accident News : 35 यात्रेकरू जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक तर दोन महिलांचे दुर्दैवी निधन
मिळेलेल्यामाहितीनुसारकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनंतर शिवसेनेची टीम देखीलघटनास्थळी पोहचली असूनमदतकार्यसध्यासुरुआहे. याबसमध्येएकूण 38 भाविक असूनते तीर्थदर्शनासाठी निघाले होते. यातील 35 यात्रेकरू जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचीमाहितीआहे. तर 32 यात्रेकरू किरकोळ जखमी असून दोन महिलांचे दुर्दैवी निधन झालेआहे. यातील एक महिला बुलाढाण्यातील रहिवाशीअसून एक अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, दोन्ही पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचीमाहितीआहे.
Accident News : नियंत्रणसुटल्याने बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली
मिळालेल्या माहितीनुसार, याअपघातातीलभाविकांचीबस चित्रकूट आणि वाराणसीचे दर्शन घेऊन नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने रवाना झालीहोती. दरम्यान, बसचालकाचेबसवरूननियंत्रणसुटल्याने नैसरे गावाजवळ समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली. गुरुवारी सकाळच्यासुमारासहाअपघातझाला. घटनेचीमाहितीमिळताचस्थानिकांनीमदतकार्यसुरुकेलं. आणिजखमींनारुग्णालयातउपचारासाठीदाखलकरण्यातआलं. सध्याजखमींवररुग्णालयातउपचारसुरुआहे.
Crime: गतिमंद तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
गतिमंद तरुणीवर अत्याचार प्रकरणी गोंदिया येथील विशेष सत्र न्यायालयानं आरोपी नराधमास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमोल तलांजे (३०) असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नावं आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-३ तथा विशेष सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी दिला. आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत त्यानं पिण्याचं पाणी मागण्याचा बहाणा करून तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जबरदस्तीनं तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता सर्व साक्ष पुराव्याच्या आधारावर न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
इतर महत्वाच्या बातम्या
