Dharmendra Health Update: बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He-Man) धर्मेंद्र (Dharmendra) यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती नाजूक आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत. देशभरातली चाहत्यांना त्यांची काळजी लागून राहिली असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी सारे प्रार्थना करत आहेत. दरम्यान, सध्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते त्यांचा धाकटा लेक बॉबी देओलसोबत (Bobby Deol) उघडपणे नसबंदीबाबत बोलत आहेत. ते म्हणतायत की, "निसर्गही त्यांचे नसबंदी करू शकत नाही..." व्हायरल व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचं वक्तव्य ऐकून बॉबी देओल काहीसा लाजून लाल झाल्याचं पाहायला मिळतंय.
धर्मेंद्र यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांचा एक जुना व्हिडीओ मूव्हीटॉकीज (movietalkies) नावाच्या इंस्टाग्राम पेजनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र खूपच तरुण आणि हुशार दिसत आहेत. तसेच, तो विनोदानं म्हणतो की, निसर्गही त्यांची नसबंदी करू शकत नाही. नसबंदी आणि दारूबंदीबाबत धर्मेंद्र म्हणतायत की, अशा प्रतिबंधांना बळी पडू नये, ज्यामुळे त्रास होतो. याशिवाय, तुम्ही काहीही करा, धर्मेंद्र यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. धर्मेंद्र यांचे लाखो चाहते या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
आता कशीय 'ही-मॅन'ची प्रकृती?
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बोलायचं झालं तर, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता त्यांना बरं वाटतंय आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गोपनीयतेचं आवाहन केलंय. यापूर्वी माध्यमांमध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी आली होती, ज्यावर देओल कुटुंबानं नाराजी व्यक्त केलेली. त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली, तर मुलगा सनी देओलनंही माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांचा एक खाजगी व्हिडीओ लीक झाला होता, ज्यामुळे देओल कुटुंबीयांमध्ये नाराजी पसरली होती. आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :