Dharmendra Health Updates: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती गेल्या बऱ्याच काळापासून चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. पण, त्यानंतर ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी (Deol Family) दिलेली. अशातच आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Dharmendra Discharge from hospital) देण्यात आला असून त्यांना घरी नेण्यात आलं आहे. रुग्णालयातून त्यांना अॅम्बुलन्समधून घरी नेण्यात आलंय. रुग्णालयातून डिस्चार्जवेळी त्यांच्यासोबत त्यांचा लेक बॉबी देओल होता. तोच त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी घेऊन गेला. अशातच आता धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी सुपरस्टारच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. त्यांनी एबीपी न्यूजला माहिती दिली की, "त्यांच्यावर बऱ्याच काळापासून माझ्याकडून उपचार सुरू आहेत. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, पण, त्यांच्यावर इथून पुढचे उपचार आता घरी सुरू राहतील..."
धर्मेंद्र यांच्या टीमनं निवेदन जाहीर केलंय, त्यात लिहिलंय की, "धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच उपचार करतील. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहावं आणि त्यांचा, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्वांचं प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांचे आभार मानतो. कृपया त्यांचा आदर करा कारण ते तुमच्यावर प्रेम करतात..."
धर्मेंद्र यांच्यावर घरीच होणार उपचार
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना साधारणतः 12 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यानंतर मात्र, त्यांची प्रकृती सुधारली असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिलेली. अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आता पुढचे उपचार घरीच केले जाणार आहेत.
धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी ब्रीच कँडी रुग्णालयात आलेले. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. धर्मेंद्र यांची भेट घेऊन निघालेल्या सर्वच स्टार्सच्या डोळ्यांत अश्रू तराळलेले.
दरम्यान, धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :