Continues below advertisement


Horoscope Today 12 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 12 नोव्हेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आज कालभैरव जयंती आहे, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान कालभैरवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांनो आज तरुणांची प्रेमप्रकरणे घरातील मोठ्या लोकांपर्यंत गेल्यामुळे, कुटुंबात छोटे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवीन ध्येयधोरणामुळे व्यवसाय धंद्यात लाभ चांगले होतील, कर्जबाजारी असणाऱ्यांना कर्जफेडीचा तगादा मात्र मागे लागेल


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीच्या लोकांनो आज लोकांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतील, परंतु थोडी धडाडी ठेवली तर न घाबरता सर्व गोष्टींना तोंड द्याल


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांनो आज तुमची बौद्धिक बाजू जगाला दिसेल, महिला थोड्या अस्वस्थ राहतील


सिंह रास (Leo Horoscope Today)


सिंह राशीच्या लोकांनो आज ज्यांना परदेश गमन करायचे आहे, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न झाल्यामुळे थोड्या अडचणी निर्माण होतील


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कन्या राशीच्या लोकांनो आज संततीच्या अंगी असलेली धडाडी पाहून आश्चर्यचकित व्हाल आणि त्यांना प्रोत्साहन ही द्याल


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांनो आज लेखकांच्या भाव विश्वातून निर्माण झालेले लेखन प्रसिद्ध पावेल, विद्यार्थी आपल्या कल्पना साम्राज्यात रमतील


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वृश्चिक राशीच्या लोकांनो आज चाकोरी बाहेर तुम्ही मांडलेले विचार, कुटुंबातील लोकांना न पटल्यामुळे निकालात निघतील


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


धनु राशीच्या लोकांनो आज कवी कलावंतांना ग्रहांची साथ मिळेल, प्रेमी लोकांची निरपेक्ष प्रेमाची बाजू मोठ्यांना कळल्यामुळे विरोध नष्ट होतील


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी खटके उडाले तरी तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, या म्हणीचा प्रत्यय येईल


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांनो आज अति शिस्त आणि तापटपणा दाखवल्यामुळे, हाताखालचे लोक दबकूनच राहतील


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धंद्यात बऱ्याच संघर्ष करावा लागेल, सरकारी कामकाजात अडथळे निर्माण होतील.


हेही वाचा


Angarak Yog 2025: पाठोपाठ संकट? मंगळ-राहूच्या अंगारक योगामुळे 7 डिसेंबरपर्यंत सावधान, 3 राशींच्या अडचणी वाढल्या, ज्योतिषींचा इशारा काय?


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)