Dhanashree Chahal : क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  युजवेंद्र चहल  आणि त्याची पत्नी धनश्री चहल (Dhanashree Chahal) यांच्यात काही तरी खटकलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं. धनश्री चहलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'चहल' हे  आडनाव हटवल्यामुळे हे दोघे वेगळे होणार आहेत, असं म्हटलं जात आहे. आता या सर्व गोष्टींवर धनश्रीनं प्रतिक्रिया दिली आहे. करिओग्राफर असणाऱ्या धनश्रीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं यजुवेंद्र आणि तिच्या नात्याबाबत लोक अफवा पसरवत आहेत, असं सांगितलं. 


धनश्रीची पोस्ट
धनश्रीनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिनं लिहिलं,'आमच्या नात्याबाबत पसरलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया या अफवा पसरवणं बंद करा.' धनश्रीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. धनश्री वर्मानं तिच्या इंस्टाग्राम युझर आयडीमधून 'चहल' आडनाव हटवले. त्यामुळे धनश्री आणि यजुवेंद्र हे विभक्त होणार आहेत, असं म्हटलं जात होतं. 



धनश्री आणि यजुवेंद्र यांची फिल्मी लव्ह स्टोरी 
धनश्री आणि  यजुवेंद्र यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. धनश्री ही यजुवेंद्रसोबत मॅचला जात असते. दोघांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. लॉकडाऊन दरम्यान यजुवेंद्रला काही तरी नवं शिकायचं होतं. त्यावेळी धनश्रीकडून डान्स शिकण्याचा निर्णय यजुवेंद्रनं घेतला. त्यवेळी धनश्री आणि  यजुवेंद्रची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


सोशल मीडियावर धनश्रीची क्रेझ 


सोशल मीडियावरील धनश्रीच्या पोस्ट या व्हायरल होत असतात. धनश्री ही वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ आणि वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिला 5.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: