Dhanashree and Chahal Relationship : भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आशिया कप 2022 स्पर्धेची तयारी करत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेनंतर  कमाल फॉर्ममध्ये आला आहे. पण अशात त्याच्या खाजगी आयुष्यात काही तर खटकलंय अशा चर्चांना उधाण आलं आहे. कारण त्याची पत्नी धनश्री चहलने (Dhanashree Chahal) तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'चहल' हे  आडनाव हटवलं आहे. त्यामुळे या कपलमध्ये काही तरी खटकलं आहे अशा चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे. 


सोशल मीडियावर चर्चांना उधाण


धनश्री आणि युजवेंद्र ही जोडी सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. आयपीएल असो किंवा भारताची कोणती टूर धनश्री युजवेंद्र असणाऱ्या सामन्यांना हमखास हजेरी लावते आणि दोघांच्या अनेक सोशल मीडियाव पोस्ट व्हायरल होतात. धनश्री इतर भारतीय क्रिकेटर्ससोबतही मजेशीर तसेच डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. पण आता काही दिवसांपूर्वीच धनश्रीने इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव काढत वर्मा हे तिचं माहेरकडचं आडनाव ठेवलं आहे. त्याच दरम्यान युजवेंद्र याने देखील एक स्टोरी शेअर करत नवं आयुष्य लोडिंग (New Life Loading) अशी स्टोरी ठेवली होती. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असावं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.


भारताचा आघाडीचा फिरकीपटू


युजवेंद्र चहलने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.


चहल विश्वचषकात ठरणार हुकूमी एक्का


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ऑरेंज कॅपवर कब्जा करणारा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरुद्ध संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत.  इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यानं जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 47 धावा खर्च करून इंग्लंडच्या चार महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहलच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असं ब्रॅड हॉगचं मत आहे. 


हे देखील वाचा-