Devendra Fadanvis and Amruta Fadanvis Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लिहिलेलं ‘देवाधी देवा’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. हे गाणं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले‘देवाधी देवा’  गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची. देवाधीदेवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीसांनी लिहले आहेत. यामुळे ऐरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील ‘डिरेक्टर’ असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत.


महाशिवरात्रीला हिंदू सणांमधे मोठे महत्व आहे. ‘देवाधी देव’  हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून महादेवावरील हे गाणं महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. 






अमृता फडणवीसांच्या गाण्यांची चर्चा


अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे कायमच चर्चेत असतात. तसेच एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं गाणं लवकरच येणार येणार असल्याचं सांगितलं देखील होतं. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या या गाण्याची चर्चा होती. अखेरीस हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्या गाण्याची आवड


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितकं त्यांच्या राजकारणामुळे चर्चेत असतात,तितकचं अनेकदा ते त्यांच्या संगीताच्या आवडीमुळेही चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीसांनी अनेक कार्यक्रमांमध्ये गायलेली गाणी ही कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं श्रीवल्ली हे गाणं असो, किंवा राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अमृता फडणवीस यांच्यासोबत त्यांनी गायलेलं रामावरील गाणं, प्रत्येकवेळस संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे आता या गाण्याची देखील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला मिलियन्स व्ह्युज मिळाले असल्याचं चित्र सोशल मीडियावर आहे.