Jackie Shroff : 'भिडू', जॅकी, 'जग्गू दादा', 'जॅकी दादा', ही सारी विशेषणं जॅकी श्रॉफच्या (Jackie Shroff) पूर्व परवानगीशिवाय वापरणा-यांची आता खैर नाही. इतकचं काय, तर जॅकी श्रॉफचा आवाज, फोटो किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित कोणतीही गोष्टीचा व्यावसायिक वापर करण्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. अश्या गोष्टींचा बेकायदेशीर वापर हा केवळ याचिकाकर्त्याला आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर समाजात मानानं जगण्याच्या अधिकारावरही गदा आणणारा आहे. असं न्यायाधीश संजीव नरूला यांनी स्पष्ट केलंय. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर या शब्दांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सोशल मीडिया साईट्स, अकाऊंट्स, एआय चॅटबॉट्स, ई कॉमर्स वेबसाईट्स या सर्वांवरील जॅकी श्रॉफच्या परवानगीशिवाय त्याची प्रतिमा वापरणा-यांच्या अडचणी वाढणार आहेत. यासर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा जॅकी श्रॉफ यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


जॅकी श्रॉफ यांनी त्यांचा अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीतून स्वत:ची अशी एक वेगळी प्रतिमा आणि ओळख तयार केलीय. मात्र काहीजण त्याचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी करत आहेत. जे योग्य नसल्याचा दावा करत जॅकी श्रॉफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेत त्यांनी 'भिडू' या शब्दाचा वापर करत तयार केलेल्या अनेक व्यावसायिकांचा तसेच एका रेस्टॉरंटचाही उल्लेख केला होता. दिल्ली हायकोर्टानं 15 ऑक्टोबर रोजी होणा-या पुढील सुनावणीत संबंधित सर्व प्रतिवाद्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस जारी केली आहे.


कोर्टाचा निकाल जॅकी श्रॉफ यांच्या बाजूने


जॅकी श्रॉफच्या  व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या GIF बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मसह 'भिडू' नावाच्या रेस्टॉरंटच्या मालकासह अनेकांना न्यायालयाने नोटिसाही बजावल्या.  व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या GIF बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मसह 'भिडू' नावाच्या रेस्टॉरंटच्या मालकासह अनेकांना न्यायालयाने नोटिसाही बजावल्या.


जॅकी श्रॉफ यांच्या याचिकेत काय म्हटलंय?


जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्या खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया आणि एआय ॲप्सशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो  किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी केली. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेवर आता 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.  जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेनुसार, पॅरोडी, विडंबनात्मक कलाकृतीसाठी आपला आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर करण्यास मनाई नाही. मात्र,  चुकीच्या गोष्टींसाठी, बदनामीकारक कटेंट तयार करण्यासाठी आपल्या आवाजाचा, व्यक्तीमत्त्वाचा वापर होता कामा नये असे जॅकी श्रॉफने म्हटले. 


ही बातमी वाचा : 


Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण