Deepika Padukone : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे. दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत. 


कोण आहे रिजुता घोष देब?


दीपिका सारख्या दिसणाऱ्या तरुणीचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) आहे. ती रिजुता ही  डिजिटल क्रिएटर आहे. रिजुता ही कोलकाता येथे राहते. ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. रिजुताला इन्स्टाग्रामवर 56 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. तिनं आत्तापर्यंत 1,200 पेक्षा जास्त पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 


रिजुताच्या फोटोला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स


रिजुताच्या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट्स करतात. काही लोक 'सस्ती दीपिका' अशी कमेंट करतात. 'तू दीपिकाची जुळी बहिण आहेस का?' असा प्रश्न कमेंट करुन रितुजाला विचारतात. तर रितुजाच्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'रणवीर सिंह जर तुला पाहिलं तर तो देखील आश्चर्यचकित होईल'


पाहा फोटो:






दीपिकाचे चित्रपट:


दीपिकाचा काही दिवसांपूर्वी गेहराईंया हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. दीपिकाच्या आगामी चित्रपटाची वाट तिचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. 


हेही वाचा:


Deepika Padukone : दीपिकाने शेअर केला खास सेल्फी; नेटकरी म्हणाले, 'तेल आणि शॅम्पू विकत घे'