Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. 'बाजीराव मस्तानी' असो वा 'पद्मावत' दीपिकाच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. दीपिका सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. दीपिकाने नुकताच एक खास फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
दीपिकाने तिचा सेल्फी शेअर करत कमेंटमध्ये लिहिले, 'केस बांधण्याचा मी प्रयत्न केला पण मी अयशस्वी ठरले.' तिच्या या फोटोला कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'तुझ्याकडे एवढे पैसे आहेत. तु शॅम्पू आणि तेल विकत घे' तर दुसऱ्याने लिहिले, 'अंघोळ करून घे थंडी नाहिये एवढी'. दीपिकाच्या एका चाहत्याने कमेंट केली, 'तु केसांना एकदा साबण लावून पाहा.'
दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 83 चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha