Dawood Ibrahim Love Mehwish Hayat: सिनेसृष्टीबाबत (Film Industry) प्रत्येकालाच उत्सुकता असते. जणू इथे वावरणाऱ्या सेलिब्रिटींचं (Celebrity World) जगच वेगळं असतं. त्यांचे कपडे, त्यांचं रहाणीमान यांसारख्या बऱ्याच गोष्टींबाबत सारेचजण उत्सुक असतात. पण, तुम्हाला माहितीय का? चकचकीत दिसणाऱ्या या चंदेरी दुनियेची एक काळ्याकुट्ट अंधारानं माखलेली दुसरी बाजूही आहेच. अनेकदा सिनेजगत आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन (Underworld Connection) जोडलं गेलेलं. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचा थेट बॉलिवूडशी (Bollywood News) संबंध असल्याचं सांगण्यात आलेलं. आज अशाच एका अभिनेत्रीबाबत बोलणार आहोत, पण ती ना बॉलिवूडची, ना साऊथची... ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, पाकिस्तानची. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात (Pakistani actress Mehwish Hayat). 

Continues below advertisement

मेहविश हयात तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. मेहविशचं नाव अंडरवर्ल्ड डॉन आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलेलं, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत एक नवा वाद निर्माण झालेला. मेहविशचं नाव दाऊद इब्राहिमशी कसं जोडलं गेलं आणि ती वादात कशी अडकली? हे सविस्तर जाणून घेऊयात...

Continues below advertisement

मेहविशचं फिल्मी करिअर 

मेहविश हयात ही पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिनं तिच्या चित्रपटांनी लाखो प्रेक्षकांची मनं जिंकलीत. तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये 'जवानी फिर नहीं आनी' या चित्रपटानं झाली. त्यानंतर तिने 'एक्टर इन लॉ' (2016), 'पंजाब नहीं जाऊंगी' (2017), 'लोड वेडिंग' (2018) आणि 'लंदन नहीं जाऊंगा' (2022) सारख्या ब्लॉकबस्टर कॉमेडीजमध्ये काम केलं. हे चित्रपट पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहेत आणि त्यांनी मेहविशला एक यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून स्थापित केलं. तिच्या कारकिर्दीनं भरभराट केली असताना, अभिनेत्रीचं नाव वादात अडकलं.

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या अफवा

2019 मध्ये जेव्हा मेहविश हयातला पाकिस्तान सरकारनं प्रतिष्ठित नागरी सन्मान 'तमघा-ए-इम्तियाज' प्रदान केला, तेव्हा तिचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं जाऊ लागलं. अफवा पसरल्या की, तिला अंडरवर्ल्ड डॉनच्या मदतीनं हा सन्मान मिळाला. काही वृत्तांमध्ये असाही दावा केला गेला की, दाऊद इब्राहिम तिच्या आयटम नंबरमधील अभिनयानं प्रभावित झाला होता. पुढे दाऊदनंच तिला पाकिस्तानी सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका मिळवून देण्यासाठी मदत केली. मेहविशची कारकीर्द ज्या काळात भरभराटीला येत होती, त्याच काळात दाऊद पाकिस्तानमध्ये राहत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, मेहविशनं कधीही या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलं नाही.

बॉलिवूड आणि 'फन्ने खां'ची ऑफर

तिच्या कारकिर्दीचा आणखी एक पैलू तेव्हा समोर आला, जेव्हा असं बोललं जाऊ लागलेलं की, तिला 'फन्ने खां' या बॉलीवूड चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनची भूमिका साकारण्यासाठी घेतलं जात आहे. दरम्यान, हे प्रत्यक्षात आलं नाही आणि ऐश्वर्या रायनं नंतर ही भूमिका साकारली, कारण त्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना अभिनय करण्यास बंदी घालण्यात आली होती. या घटनेनं निश्चितच स्पष्ट केलं की, मेहविशला बॉलिवूडमध्ये गांभीर्यानं घेतलं जात होतं.

राजकारणाची आवड आणि पंतप्रधान बनण्याची इच्छा 

अभिनयाव्यतिरिक्त, मेहविश हयातची राजकारणातली आवड देखील चर्चेचा विषय राहिली आहे. एका मुलाखतीत तिनं उघडपणे एक दिवस पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं असा युक्तिवाद केला की, "जर इम्रान खानसारखा क्रिकेटपटू देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर अभिनेता का नाही?" समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, असं तिचं ठाम मत आहे. मेहविशनं अनेक राजकीय मुद्द्यांवर आणि भारत-पाकिस्तान संघर्षावरही उघडपणे तिचे विचार व्यक्त केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Health Update: जेव्हा धाकट्या लेकासमोरच धर्मेंद्र यांनी काढलेला विषय; म्हणालेले, 'मेरी नसबंदी...'