Ranya Rao Arrested in Gold Smuggling Case: कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  त्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र राव हे  कर्नाटक राज्यात डीजीपी (सिव्हल राइट्स एन्फोर्समेंट) या पदावर कार्यरत होते. दरम्यान, त्यांचे  महिलांसोबतचे व्हिडिओ  सोशल मीडियात व्हायरल होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  

Continues below advertisement

रामचंद्र राव यांचे कथित  महिलांसोबतचे व्हिडिओ व्हायरल

सोमवारी त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. ज्यामध्ये रामचंद्र राव हे विविध महिलांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच प्रशासन तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, रामचंद्र यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हे व्हिडिओ त्यांनी बनावट आणि खोटे असल्याचं स्पष्ट केलं. हे व्हिडिओ खोटे आहेत की खरे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

रामचंद्र राव यांची मुलगी अटकेत

दरम्यान, रामचंद्र  राव यांची मुलगी देखील पोलिसांच्या तावडीत आहे.  अभिनेत्री राण्या राव हिला कर्नाटकातील सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करी  प्रकरणात अटक करण्यात आली होती. मार्च 2025साली तिला दुबईच्या सहलीवरून  परतताना अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या ताब्यातून  14.8 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत.  या सोन्याच्या बारची किंमत अंदाजे 12.56कोटी  असल्याची माहिती आहे. तिच्या अटकेनंतर बंगळूरूमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आला.  छापा टाकल्यानंतर पोलिसांनी मालमत्ता देखील जप्त केली आहे.

Continues below advertisement

राण्या रावच्या घरातून सोने आणि पैसे जप्त

अधिकाऱ्यांनी राण्या रावच्या घरातून अंदाजे 2.06 कोटी किमतीचे सोन्याचे दागिनी, तसेच 2.67 कोटी रोख जप्त केली आहे. सध्या राण्या राव या प्रकरणात अटकेत आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.  दरम्यान, आता राण्या राव यांचे सावत्र वडील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव  हे कथित  व्हिडिओ प्रकरणावरून अडचणीत सापडले आहे.  या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई काय करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कंगना रणौतला काळी जादू येते? मासिक पाळीचं रक्त मिसळून लाडू वाटले? एक्स बॉयफ्रेंडनेही केले आरोप

मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरात हलला पाळणा, नव्या घरात केलं गोंडस बाळाचं आगमन