चंद्रपूर : राज्यात भाजपच्या हातून निसटलेल्या काही महापालिकांपैकी एक म्हणजे चंद्रपूर महापालिका (Chandrapur Municipal Corporation). या ठिकाणी कुणालाच बहुमत मिळालेले नाही. त्रिशंकू अवस्थेत असलेल्या महापालिकेत भाजपने ऑपरेशन लोटस (BJP Operation Lotus) सुरू केलं आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मात्र यावर संजय राऊत आणि काँग्रेसनेही भाजपवर पलटवार केले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष नेत्यांच्या अंतर्गत द्वंदाने ग्रासलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल लागला आणि कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. भाजप बहुमता पासून बरच दूर असलं तरी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याची शक्यता बळवली आहे.
एकीकडे शिवसेना उबाठा गटासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगत काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचे सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली. मात्र महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, तो भाजपचाच होणार हे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटासाठी सर्व दारे खुली
भाजपच्या दाव्याला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र चंद्रपुरात आपल्याशिवाय महापौर बसणार नाही हे लक्षात आणून दिलं. विशेष म्हणजे भाजपसोबत जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली नाही. पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील असं सांगत ठाकरे गटासाठी सर्व दारे खुली असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी मात्र काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असल्याचं सांगितलं. भाजपचेच काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. सोबतच भाजप देखील दोन गटांमध्ये विभागलं गेल्याचं सांगायला वडेट्टीवार विसरले नाहीत.
एकूण 66 नगरसेवक संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातही आपल्या पक्षातले नगरसेवक राखून दुसऱ्या पक्षातले नगरसेवक जोडण्याची मोठी कसरत सर्वच राजकीय पक्षांना करावी लागणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका अंतिम निकाल-
एकूण - 66
भाजप - 23शिवसेना - 1काँग्रेस - 30ठाकरे गट - 6बसपा - 1वंचित - 2एमआयएम - 1अपक्ष - 2
ही बातमी वाचा: