कंगना रणौतला काळी जादू येते? मासिक पाळीचं रक्त मिसळून लाडू वाटले? एक्स बॉयफ्रेंडनेही केले आरोप
Kangana Ranaut Opens Up About Black Magic Allegations: कंगना राणौतने अलिकडेच काळी जादू आणि त्यासंदर्भातील आरोपांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Kangana Ranaut Opens Up About Black Magic Allegations
1/10
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असते. तिनं बॉलिवूडमधील कलाकारांवर कायम टीकेचे बाण सोडले आहेत.
2/10
केवळ बॉलिवूड नाही तर, बऱ्याचदा राजकारण्यांवर टीका करताना आपण पहिलं असेल. परंतु, कंगना रणौत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
3/10
कंगना रणौतने अलिकडेच काळी जादू येते आणि काळी जादू केली असल्याचा खुलासा एका पोस्टद्वारे केला होता. तिची पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली होती.
4/10
कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या तिनं म्हटलं होतं की, "जर सुपरपॉवर असेल तर, तुम्हाला चेटकीण म्हटलं जातं. मलाही अनेकदा चेटकीण असं संबोधण्यात आलं. मात्र, मी कधीच अशा लोकांसाठी स्वतःला उद्ध्वस्त केलं नाही".
5/10
कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं की, "2016मध्ये एका संपदकाने लेख लिहिला होता. यात दावा करण्यात आला की, एका पत्रकाराकडे मला काळी जादू येत असल्याचे पुरावे आहेत.
6/10
"इतकंच नाही तर, त्यात असे म्हटले आहे की, दिवाळीच्या मिठाई आणि लाडूमध्ये मासिक पाळीचे रक्त मिसळून लोकांना वाटायची".
7/10
एका मुलाखतीत कंगना म्हणाले, "जेव्हा काही लोक मला नावं ठेवतात. माझ्या मासिक पाळीबाबत बोलतात. तेव्हा मला वाईट वाटत नाही. किंवा त्रास होत नाही".
8/10
"पण मासिक पाळीला वाईट म्हणू नका. कारण मासिक पाळीच्या रक्तात वाईट असं काहीच नसतं", असं तिनं स्पष्ट केलं.
9/10
"ते दिवस देखील खूप मजेदार होते. काही सिनेमा पार्श्वभूमी नसताना माझ्या कारकिर्दीत मला यश मिळाले", असंही कंगना म्हणाली.
10/10
कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेंड, अध्यायन सुमन यानेही अभिनेत्रीवर काळी जादू करण्याचा आरोप केला होता. हे दोघे २००८ ते २००९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
Published at : 20 Jan 2026 06:46 PM (IST)