मुंबई : जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 73वं कान्स फिल्म फेस्टिवल रद्द करण्यात आलं आहे. डेडलाइन डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी गुरुवारी याबाबत सांगितलं असून वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलचं आयोजन मे मध्ये करण्यात येणार होतं.


कान्स फिल्म फेस्टिवलच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून यासंदर्भात ट्वीटही करण्यात आलं आहे. आयोजकांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं आहे की, 'वैश्विक आरोग्य संकटादरम्यान आम्ही कोरोनाग्रस्तांसोबत आहोत. जे कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.'



आयोजकांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'कान्स फिल्म फेस्टिवल 12 मेपासून 23 मेपर्यंत आयोजित करण्यात येणार होतं. पण ते रद्द करण्यात आलं असून जुलैमध्ये पुन्हा आयोजित करण्याबाबत विचार केला जात आहे.'


कोरोना व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्रान्स सरकारने 8 मार्चपासून फ्रान्स सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 1000 पेक्षा जास्त लोकांच्या सार्वजनिक संमेलनावर बंदी घातली आहे.


पाहा व्हिडीओ : Coronavirus | Kanika Kapoor | कनिका कपूरमुळे कोरोना संसदेत पोहोचला?



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम बॉलिवूडवरही झाला आहे. अनेक चित्रपटांचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं असून काही चित्रपटांचं शुटिंगही थआंबवण्यात आलं आहे. यंदा मध्ये प्रदेशमध्ये होणारा आयफा अवॉर्डही रद्द करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये आयोजित झी सिने अवॉर्ड्सही प्रेक्षकांशिवाय टीव्ही शो प्रमाणे शुट करण्यात आलं आहे.


दरम्यान, बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण


Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात


Coronavirus | हॉलिवूडमधील 'हे' सेलिब्रिटींना कोरोना बाधित

#Coronavirus कोरोनाबाबत जनजागृती करणारे फिल्मी बॅनर्स पाहिलेत का?