1. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजाराहून अधिक नवे रुग्ण, 1354 जणांचा मृत्यू, जगभरातील मृतांचा आकडा 11 हजार पार, इटलीत गेल्या 24 तासात 627 बळी,
2. कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रात 52 कोरोनाग्रस्त, 5 जणांवर यशस्वी उपचार, तर केरळातल्या 40 कोरोनाग्रस्तांसह देशात एकूण 246 रुग्ण
3. अत्यावशक सेवा वगळून मुंबई, एमएमआर रिजन, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, गर्दीवर नियंत्रण न मिळाल्यास लोकल, बस बंद करणार
4. रविवारी जनता कर्फ्यूसाठी देशभरातल्या रेल्वेला ब्रेक, 2400 पॅसेंजर आणि 1300 मेल रद्द, मुंबईतल्या लोकल फेऱ्यांची संख्याही घटणार
5. बॉलिवूडची गायिका कनिका कपूरविरुद्ध गुन्हा दाखल, लंडनहून परतलेल्या कनिकामुळे कोरोना संसदेच्या उंबरठ्यावर
6. कोरोनाची लागण झालेली गायिका कनिकाच्या संपर्कात आलेल्या खासदारांची संसद आणि राष्ट्रपती भवनात हजेरी, अधिवेशन स्थगित करण्याची टीएमसीची मागणी
7. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द, तर 15 एप्रिलनंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा, दहावी सोडून इतर शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश
8. कोरोनाच्या धास्तीनं पुणे सोडून गावाकडं जाण्यासाठी तोबा गर्दी, रेल्वे स्टेशनवर लांबच लांब रांगा, तर मुंबईतील परप्रांतीय स्वतःच्या घराकडे रवाना
9. केंद्र सरकारकडून मास्क, सॅनिटायझरच्या किंमती निश्चित, काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचं पाऊल
10. 'गो एअर'ची सर्व उड्डाणे जनता कर्फ्यूदरम्यान रद्द करण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला पाठिंबा