Mission Impossible 7 : चीनमध्ये हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरसने जगभरात पसरला आहे. व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक देशांनी चीनमधून आयात-निर्यात होणाऱ्या गोष्टींवर रोख लावली आहे. तसेच कोरोना व्हायरसचा धोका फक्त व्यापारावरच नाहीतर फिल्म इंडस्ट्रीवरही होताना दिसत आहे. इटलीमध्ये हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूजचा चित्रपट 'मिशन इंपॉसिबल 7' चं शुटिंग सध्या थांबवलं आहे.


पॅरामाउंटन पिक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, 'इटलीमध्ये सुरू असलेलं चित्रपटाचं शुटिंग कोरोना व्हायरसमुळे थांबवण्यात आलं आहे. टॉम क्रूज अभिनीत या चित्रपटाची शुटिंग साधारणतः 3 आठवड्यांपर्यंत सुरू राहणार होती. पण व्हेनिस शहरामध्ये होणार शुटिंग थांबवण्यात आलं आहे.' तसेच शुटिंग थांबवण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही शुटिंग अनेकदा थांबवण्यात आलं आहे. 'मिशन इंपॉसिबल 7' हा या सिरीजमधील सातवा चित्रपट आहे. व्हेनिस शहराणध्ये होणाऱ्या शुटिंगवेळी अभिनेता टॉम क्रूज सेयवर उपस्थित नव्हता.


पाहा व्हिडीओ : कोरोनामुळे स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज, एसी महागणार



इटलीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीन आणि दक्षिण कोरियानंतर इटली हा कोरोनाग्रस्त देश आहे. पॅरामाउंटन पिक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, 'चित्रपट निर्मीतीसाठी काम करणाऱ्या टीमची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाच्या सदस्यांना घरी जाण्यासाठी सांगण्यात आलं असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुन्हा शुटिंग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही पॅरामाउंटन पिक्चर्सने सांगितलं आहे.


दरम्यान, चीनमध्ये घातक कोरोना व्हायरसने आणखी 150 लोकांचा बळी घेतला असून यामळे मृतांचा आकडा दोन हजारांवर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधील 2,592 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 77,000 पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान, विश्व स्वास्थ संस्थेच्या (WHO)तज्ञांनी चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहराचा दौरा केला.


संबंधित बातम्या : 


Corona Virus | कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 2,592 लोकांचा मृत्यू


कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा


Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित