College Romance Season 3 : कॉलेजच्या दिवसांमध्‍ये व्‍यक्‍तीच्‍या जीवनातील सर्वात संस्‍मरणीय आठवणी सामावलेल्‍या असतात. याच आठवणींना आकार देण्‍यासोबत त्‍या कॉलेज दिवसांना उजाळा देत शो ‘कॉलेज रोमांस’ तिसऱ्या सीझनसह (College Romance Season 3) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सीझन 3 प्रेक्षकांना मैत्री, ड्रामा, नात्‍यांच्‍या धमाल क्षणांनी भरलेल्‍या आणखी एका रोलर-कोस्‍टर राईडवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाला आहे. या नव्या कथानकामध्‍ये नवीन चेहरे व अधिक ट्विस्‍ट्सच्‍या सादरीकरणासह हा सीझन जुनी पात्र व त्‍यांच्‍या डायनॅमिक्‍स कथांना देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.


‘कॉलेज रोमांस सीझन 3’ (College Romance Season 3) या शोमध्‍ये हार्ड-टू-प्‍लीज, मोहक व आत्‍मविश्‍वासू दीपिकाची भूमिका साकारणारी श्रेया मेहता (Shreya Mehta) हिने या शोच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिचे स्‍वत:चे कॉलेज दिवस, तिच्‍या अपेक्षा व तिने सामना केलेली वास्‍तविकता या आठवणींना उजाळा दिला आहे. श्रेया या शोच्‍या तिसऱ्या सीझनसाठी आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज झाली आहे.



कॉलेज म्हणजे...


आपल्या आठवणी सांगताना श्रेया म्‍हणाली की, ‘माझ्या कॉलेज जीवनामध्‍ये मी फूड व फॅशनचा मनसोक्‍त आनंद घेतला. आमचा चौघींचा ग्रुप होता. आम्‍ही चौघी सकाळी लवकर उठायचो, रोज हटके स्टाईल करण्‍याचा प्रयत्‍न करायचो. वर्गामध्‍ये क्रिएटिव्‍ह राहायचो, आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे आम्‍ही रस्‍त्‍यावरील खाद्यपदार्थांचा अर्थात फास्टफूडचा मनसोक्‍त आस्‍वाद घ्‍यायचो. कॉलेजसाठी माझ्या अपेक्षा चित्रपट ‘रंग दे बसंती’मधील पात्रांप्रमाणे होत्‍या, पण, इथली खरी परिस्थिती शो ‘सेक्‍स इन द सिटी’प्रमाणे होती, जेथे चार मुली रस्‍त्‍यांवर फेरफटका मारत असतात.’


ओटीटीवर होणार प्रदर्शित


‘द व्‍हायरल फिव्‍हर’ निर्मित आणि अरुनभ कुमार यांच्‍याद्वारे निर्मिती असलेला शो ‘कॉलेज रोमांस सीझन 3’चे दिग्‍दर्शक परिजात जोशी आहेत. या शोचे लेखन आशुतोष चतुर्वेदी व पंकज मावछी यांनी केले आहे. या शोमध्‍ये गगन अरोरा, अपूर्वा अरोरा, केशव साधना, श्रेया मेहता, नुपूर नागपाल, जान्‍हवी रावत व एकलव्‍य कश्‍यप हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘कॉलेज रोमांस सीझन 3’ (College Romance Season 3)  हा शो लवकरच सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 12 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मस्त्र'नं केला 100 कोटींचा टप्पा पार; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई