Chhaya Kadam at Cannes Film Festival :  मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या सिनेमाचं कान्समध्ये होणाऱ्या प्रमियरसाठी त्या रवाना झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यासाठी अनेक कमेंट्स येत त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा या सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होत आहेत. यामध्ये छाया कदम यांच्या सिनेमाचं कान्समध्ये भरभरुन कौतुक करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या या सिनेमाल कान्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 


छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यानंतर कान्स सोहळ्यामुळेही त्या अनेकदिवसांपासून चर्चेत आहेत. छाया कदम यांनी पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याच सिनेमाचा प्रमिअर शो कान्स सोहळ्यात करण्यात आला. त्यासाठी छाया कदम यांनी कान्स सोहळ्याला हजेरी लावली. 


आईच्या नथीने वेधलं लक्ष


दरम्यान या सोहळ्यातील काही फोटो छाया कदम यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केले होते. त्यामध्ये त्यांनी आईची साडी परिधान केली होती. त्याचप्रमाणे तिची नथही घातली होती. तिच नथ त्यांनी चित्रपटाच्या प्रमिअरला देखील घातली. जी सध्या सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सोहळ्यातून छाया कदम यांनी त्यांच्या आईसाठीही एक खास पोस्ट लिहिली होती. त्याची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.  






छाया कदम यांचे सिनेमे


छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये  अनेक भूमिका साकारल्या आहेत.  'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले.                                                                   


ही बातमी वाचा : 


पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर राग, जॉली एलएलबी सिनेमासोबत तुलना; पोर्शे कार अपघातावर मराठी कलाकारांच्या संतप्त पोस्ट