Chhaava Worldwide Box Office Collection Day 31: 'छावा' (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर या चित्रपटानं भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. रिलीजचे 30 दिवस उलटल्यानंतरही 'छावा' थांबण्याचं नाव काही घेत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकलेल्या विक्की कौशलची भूरळ केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नाहीतर जगभरात सुरू आहे. प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी, 'छावा' सातत्यानं अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. 


'छावा'नं आता जजभरातील बॉक्स ऑफिसवर 750 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विक्की कौशलच्या चित्रपटानं 30 दिवसांत एकूण 750.5 कोटी रुपये कमावले आहेत. 31व्या दिवशी चित्रपटानं भारतात 8 कोटी रुपये कमावले आहे. जर हे कलेक्शन जोडलं तर, 'छावा'चं एकूण कलेक्शन 758.5 कोटी रुपये होतात. 






'छावा'नं पार केला 750 कोटींचा आकडा 


विक्की कौशलच्या 'छावा'नं महिन्याभराच्या शानदार कलेक्शनसह रजनीकांत यांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. साऊथ सुपरस्टारच्या खात्यात वर्ल्डवाईड दहाव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्मचा रेकॉर्ड होता. रजनीकांतची 2018 मध्ये रिलीज झालेली फिल्म 2.0 नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 744.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, आता 758.5 कोटींच्या कलेक्शनसह 'छावा'नं हा आकडादेखील पार केला आहे. आता वर्ल्डवाईड दहावी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनली आहे.  


दरम्यान, 'छावा'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पु्त्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'छावा'मध्ये विक्की कौशलच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं साकारली आहे. याव्यतिरिक्त 'छावा'मध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर झळकले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Santosh Juvekar On Akshaye Khanna: अक्षय खन्नाकडे साधं पाहिलंही नाही म्हटल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं, आता संतोष जुवेकर म्हणाला....